महाराष्ट्र
Trending

लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक, विरोधी पक्षनेते अजितदादांनी काढले गृहखात्याचे वाभाडे !

गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना: विरोधी पक्षनेते अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई, दि. 15 :- मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थिनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

ही घटना घाडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थिनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करून सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी सरकारने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!