महाराष्ट्र
Trending

कांदा खरेदीचे अजब माप ! नाफेड जर ५५ – ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय !!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तातडीच्या मुद्द्याद्वारे वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई, दि. ३ मार्च – एकीकडे कांदयाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त असताना नाफेडने ५५- ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असे म्हटले आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

नाफेड जर ५५ – ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता.

त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी कोणत्याही अटी व शर्तीशिवाय नाफेड कांदा खरेदी करेल, असे सभागृहात म्हटले होते. कांदा शेतकऱ्यांच्या या समस्येवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले, याची दखल उपमुख्यमंत्री यांनी घेऊन याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!