महाराष्ट्र
Trending

विष्णूपुरीला जाण्याचा रस्ता विचारून पोलिसाला लुटले, तीन चोरटे मोटारसायकल घेऊन लातूर फाट्याकडे पळाले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – पाहुण्याला सोडून परत आपल्या घरी जात असणार्या पोलिसाला तिघांनी रस्त्यात थांबवले. रस्ता विचारण्याचा बहाना करून त्यांनी मोटारसायकलची चावी काढून नंतर पोलिसाला ढकलून दिले व मोटारसायकल घेऊन पसार झाले. ही घटना नांदेड जिल्ह्यात घडली.

उद्धव माधवराव मुंडे (वय 53 वर्षे, व्यवसाय नौकरी पोहेकॉ, पोलिस स्टेशन धर्माबाद, जि. नांदेड) यांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 23/06/2023 रोजी पोहेकॉ उद्धव मुंडे यांना मुख्यमंत्री बंदोबस्त असल्याचे सायंकाळी हजेरीवर समज मिळाली. दि. 24/06/2023 रोजी 10.00 वाजता बंदोबस्तकामी नांदेड येथे पोहेकॉ उद्धव मुंडे हजर झाले. CM यांच्या बंदोबस्ताची रियसल केली.

दि. 25/06/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तकामी पोहेकॉ उद्धव माधवराव मुंडे हे अपचलनगर येथे हजर झाले व बंदोबस्त करून पोहेकॉ उद्धव मुंडे यांचे घर नांदेड येथेच असल्याने ते घरी परतले. त्यांचे पाहुणे हे पोहेकॉ उद्धव मुंडे यांच्या घरी आल्याने त्यांच्याकडे मोटारसायकल नसल्याने पोहेकॉ उद्धव मुंडे यांनी त्यांना त्यांच्या मोटारसायकलने सोडण्यासाठी त्यांच्या घरी राजश्री पब्लिक स्कूलच्या बाजुला त्यांच्या राहते घरी सोडले.

त्यानंतर लगेच पोहेकॉ उद्धव मुंडे हे मोटारसायकने परत लातूर फाटा ते विष्णुपुरी रोडवर राजश्री पब्लिक स्कूलच्या कॉर्नरला वेळ रात्री 20.30 वाजेदरम्यान लातूर फाट्याकडे निघाले. लातूर फाट्याकडून तीन जण पोहेकॉ उद्धव मुंडे यांच्या मोटारसायकल समोर आले. त्यांनी पोहेकॉ उद्धव मुंडे यांना विचारले की, विष्णुपुरी का रोड कोणसा हे ? सरळ रस्ता आहे दोन किलोमीटर नंतर विष्णुपुरी येते असे म्हणताच एकाने पोहेकॉ उद्धव मुंडे यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली.

पोहेकॉ उद्धव मुंडे यांना गाडीवरून ढकलून दिले. इतर दोन जणांना धमकावून मोटारसायक जबरदस्तीने हिसकावून लातूर फाट्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी पोहेकॉ उद्धव मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांवर नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!