राजकारण
Trending

माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही माझा इतिहास विचारला गेला ! भाजपातून बाहेर पडल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का? धनंजय मुंडे

संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – आम्ही बीडकरांची सेवा करत राहणार आणि आमचे उत्तरदायित्व पार पाडणार. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही माझा इतिहास विचारला गेला आणि माझा इतिहास जनतेला सांगावासा वाटला. माझ्या राजकीय इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात स्व. मुंडे साहेब व नंतर अजितदादांनी मदत केली. भाजप मधून बाहेर पडल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का? स्व. मुंडे साहेबांच्या हाताला धरून संघर्ष केला, असा समाचार धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा घेतला. बीडच्या जाहीर सभेत ते बोलत होते. अलौकिक, अतिविराट आणि अविस्मरणीय, असेच वर्णन त्यांनी या सभेचे केले.

रविवारी बीड शहरात झालेल्या सभेसाठी सबंध जिल्हाभरातून आलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन सर्वांचे आभार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मानले. दरम्यान, मुंडे म्हणाले की, ही सभा कुणालाही उत्तर द्यायला नाही नाही तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या उत्तरदायित्वाची सभा आणि ती सभा बीड जिल्ह्याच्या जनतेने आशीर्वाद देऊन यशस्वी केली. आजवर जिल्ह्याप्रती विकासाच्या माध्यमातून उत्तरदायित्व अजितदादांनी व्यक्त केले आहे.

एकच वादा, अजितदादा – आजची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळ मिटवण्यासाठीची सभा आहे. त्यासाठी आपला आवाज दिल्लीत गेला पाहिजे. या जिल्ह्याच्या अनेक अपेक्षा मा. अजितदादांनी पूर्ण केल्या, करत आहेत व पुढेही करतील; म्हणूनच त्यांना एकच वादा, अजितदादा म्हटल जातं. अजितदादांशिवाय बीड जिल्ह्यातील असंख्य प्रश्न सुटू शकत नाहीत.

जिल्हा पाणीदार करण्याचे अभिवचन- आज राज्याची तिजोरी दादांच्या रूपाने जिल्ह्यात आली होती. त्या तिजोरीचे आम्ही स्वागत करून आमच्या मागण्या मांडल्या. जिल्हा पाणीदार करण्याचे अभिवचन दादांनी आम्हाला दिले आहे, त्याबद्दल दादांचे मनस्वी आभार.

सुरुवातीच्या काळात स्व. मुंडे साहेब व नंतर अजितदादांनी केली मदत- बीड जिल्ह्यातील मान्यवरांनी अनेक अपेक्षा आज व्यक्त केल्या आहेत. आम्ही बीडकरांची सेवा करत राहणार आणि आमचे उत्तरदायित्व पार पाडणार. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही माझा इतिहास विचारला गेला आणि माझा इतिहास जनतेला सांगावासा वाटला. माझ्या राजकीय इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात स्व. मुंडे साहेब व नंतर अजितदादांनी मदत केली. भाजप मधून बाहेर पडल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का? स्व. मुंडे साहेबांच्या हाताला धरून संघर्ष केला.

सर्वाधिक संघर्ष केला हे ‘लोक माझ्या सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये माझ्या दैवताने लिहीले- प्रश्नांसाठी संघर्ष कसा करायचा हे मला स्व.मुंडे साहेबांनी शिकवले, प्रश्न सोडवायचे कसे हे मी दादांच्या नेतृत्वात शिकलो, हा माझा इतिहास आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला हे ‘लोक माझ्या सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये माझ्या दैवताने लिहीले आहे. त्यामध्ये विधानसभेपेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची कर्तबगारी जास्त होती असे सांगण्यात आले, हा माझा इतिहास आहे.

शेतकऱ्याच्या पोराला कृषी विभागाची जबाबदारी दिली- माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी आज शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या परिस्थितीत शासन म्हणून पूर्णपणे पाठीशी राहू. तुम्ही आज शेतकऱ्याच्या पोराला कृषी विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी मी पार पाडेन, असा विश्वास व्यक्त केला.

यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. या मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्याचे फार मोठे योगदान आहे याची आठवण करत स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींचे स्मरण करून अभिवादन केले.

या सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केलेले प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, संजय बनसोडे, रुपाली चाकणकर, युवक नेते सुरज चव्हाण, आ.सतिशभाऊ चव्हाण, आ.विक्रम काळे, अमरसिंह भैय्या पंडित, आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळा काका आजबे उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!