राजकारण
Trending

भाकरी फिरवणार होतो पण आता ती भाकरीच थांबली, कुणाला जायचं असेत तर थांबवू शकत नाही ! अजित पवारांना राजीनाम्याची माहिती दिली होती: शरद पवार

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेस गैरहजेरी

मुंबई, दि. ५- भाकरी फिरवणार होतो पण आता ती भाकरीच थांबली, असं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कुणाला जायचं असेत तर थांबवू शकत नाही, असा इशारा देत अजित पवारांना राजीनाम्याची माहिती दिली होती असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेस अजित पवार गैरहजर होते. मात्र अजित पवारांच्या अनुपस्थितीचा वेगळा अर्थ काढू नका, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत शरद पवरा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाही केले. शरद पवार म्हणाले की, मी माफी मागतो. राजीनामा देणार असल्याची माहिती सर्वांना माहिती नव्हती. मी विचारलं असत तर राजीनामा देण्यास नकार दिला असता म्हणून मी कुणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे मला असा अचानक निर्णय जाहीर करावा लागला, असेही पवार यावेळी म्हणाले. मात्र, राजीनामा देणार असल्याची माहिती अजित पवार यांना दिली होती, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

नवीन सहकार्यांना संधी दिली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कार्यकर्ते, नेते आणि जनतेच्या प्रमाने मी भारावून गेलो. अन्य पक्षांनीही मी राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. सर्वांच्या भावना लक्षात घेता मी निर्णयाचा फेरविचार केला आणि अध्यपद सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले.

पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल करणार असल्याचेही ते म्हणाले. भाकरी फिरवणार होतो पण आता ती भाकरीच थांबली, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरावर म्हणाले. महाविकास आघाडीवर काहीही फरक पडणार नाही. आम्ही एकत्र काम करू. समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

इथे कोण उपस्थित आहे याचा वेगळा अर्थ काढू नका, असेही पवार म्हणाले. यावेळी अजित पवार उपस्थित नव्हते. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. कुणाला जायचं असेत तर थांबवू शकत नाही. मात्र, या अशा परिस्थितीत नेतृत्वाला आघाडीवर काम करावं लागेल, असेही पवार यावेळी म्हणाले.

कार्याध्यक्ष नेमण्याचा विचार नाही. अनेक जण १० ते १५ वर्षांपासून पक्षात काम करत आहेत. आम्हाला काम करण्याची संधी द्या, अशी अनेकांची सूचना आहे. सर्वांना विश्वासात घेवून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यांनी यावेळी जाहीर केले.

Back to top button
error: Content is protected !!