छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सातव्या वेतन आयोगासाठी आक्रमक ! शासन आदेश न निघाल्यास सोमवारपासून बेमुदत संपाची हाक !!

शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शासनाची सापत्न वागणूक: कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर

संभाजीनगर लाईव्ह, दि.१६ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४० हून अधिक विभागातील कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोजन लागू केला. मात्र १३ विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागूणक दिली, असे प्रतिपादन विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी केले. दरम्यान, सभेत २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुरुवारी दि.१६ विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप सुरु केला. आंदोलनास प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव दिलीप भरड, प्रकाश आकडे, नारायण पवार, रवि भिंगारे आदींनी मार्गदर्शन केले. सभेत २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला तर बुधवारपासून काळ्याफिती लावून काम करण्यात येत आहे. या आंदोलनात पुढील मागण्यांचा समावेश आहे.

१ .सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वत लागू करणे .
२. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १० :२० :३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे

३. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १ हजार ४१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे.

४. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे
५. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे

६ .विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे

या प्रमुख मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकून आजपासून परीक्षेचे काम बंद आंदोलनाची सुरुवात करून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

आंदोलनाचे टप्पे पुढीलप्रमाणे :
१) २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार
२) १४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते अडीच अवकाश काळात निदर्शने
३) १५ फेब्रुवारी रोजी काळ्याफिती लावून कार्यालयीन काम करण्यात आले.
५) १६ फेब्रुवारी रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप
६) २० फेब्रुवारीपासून सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाचे बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!