महाराष्ट्र
Trending

तलाठ्याच्या मदतनीसाने हॉटेलात पार्टी झोडलेल्या बिलाची मागितली चक्क लाच ! मौज मजासाठी सातबाऱ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची अशीही अडवणूक !!

नाशिक, दि. १६ – हॉटेलात पार्टी झोडलेल्या बिलाची तक्रारदाराकडून २९४० रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्याच्या खासगी मदतनिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदी केलेल्या शेत जमीनीची सातबार्यावर नोंद घेण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळीत समोर आले.

रविंद्र कारभारी मोरे (खाजगी मदतनीस कामगार, तलाठी कार्यालय, चांदवड ता. चांदवड, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे खरेदी केलेल्या जमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने लाचेची मागणी केली. रविंद्र कारभारी मोरे (खाजगी मदतनीस कामगार, तलाठी कार्यालय, चांदवड ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे बिलाची २९४०/- रूपये रक्कमेची तक्रारदार यांचे कडे लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान रविंद्र कारभारी मोरे (खाजगी मदतनीस कामगार, तलाठी कार्यालय, चांदवड ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी तक्रारदार यांचे कडे हॉटेलमध्ये पार्टी केलेल्या बिलाची २९४०/- रूपये रक्कमेची पंच व साक्षीदार यांच्या समक्ष दि. ०७/०१/२०२३ रोजी तलाठी कार्यालय, चांदवड येथे लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले.

त्यामुळे त्यांच्याविरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे दि. १५/०२/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!