छत्रपती संभाजीनगर
Trending

वैजापूर जलसंधारण विभागाचा अधिकारी साडेआठ लाखांची लाच घेताना चतुर्भुज ! परभणी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बिल काढण्यासाठी औरंगाबाद कार्यालयासमोर घेतली लाच, जालना पथकाची कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – परभणी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधा-याचे १,३७,००,०००/- रुपयांची देयके काढण्यासाठी ८,५३,२५० रुपयांची लाच घेताना जलसंधारणचे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकले. औरंगाबाद कार्यालयासमोर इनोव्हा गाडीमध्ये लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज केली. सदर जलसंधारण अधिकाऱ्याकडे वैजापूरचा चार्ज आहे.

ऋषीकेश प्रल्हादराव देशमुख (वय ३४ वर्षे व्यवसाय – नोकरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वैजापूर चार्ज – उपविभागिय जलसंधारण अधिकारी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद), .भाऊसाहेब दादाराव गोरे (लिपिक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ कार्यालय औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधा-याचे गवळी पिंपळी (ता. सोनपेठ जि. परभणी) येथील कामाचे देयक १८,००,०००/- व गोविंदपुर (ता.पूर्णा जि. परभणी) येथील कामाचे देयक १,१९,००,०००/- रु असे मिळून दोन्ही कामाचे देयक १,३७,००,०००/- रुपये देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्यासाठी ७.५ टक्के प्रमाणे ८,०३,२५०/ रुपये, स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५०,०००/ रुपये असे एकूण ८,५३,२५०/ रुपयाची मागणी केली.

आज, ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर ऋषीकेश प्रल्हादराव देशमुख (वय ३४ वर्षे व्यवसाय – नोकरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वैजापूर चार्ज – उपविभागिय जलसंधारण अधिकारी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद) यांनी त्यांच्या ताब्यातील इनव्हा गाडीमध्ये (क्रं. MH -20 FG-5005) ८,५३,२५० रुपये स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारताच सापळा पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, सुदाम पाचोरकर, पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि जालना, सापळा अधिकारी शंकर महादेव मुटेकर, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. जालना, सापळा पथक :-पोलीस अंमलदार गजानन कांबळे, जमधडे, बुजाडे, खंदारे गिराम, ला.प्र.वि, जालना यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!