गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक ३० हजारांची लाच घेताना सापळ्यात अडकला !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – शेतीच्या मोजमीसाठी ४० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपये लाच घेताना गंगापूरचे भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पंचाससक्ष ही कारवाई आज करण्यात आली.
साळोबा लक्ष्मण वेताळ (वय 51 वर्षे व्यवसाय नोकरी उप अधीक्षक भूमि अभिलेख ता गंगापूर .(वर्ग-2) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या शेतीच्या मोजणी करिता 40000/-रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 35000/- रुपये घेण्याचे मान्य करून पंचा समक्ष 30000/-रुपये स्वीकारले. दिनांक 06/02/2023 रोजी ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – गोरख गांगुर्डे पोलीस उप अधीक्षक, सापळा पथक – पोना/दिगंबर पाठक, पोना/सुनील पाटील, चालक पोअं/ चंद्रकांत शिंदे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe