Uncategorized
Trending

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डंम्पिंग ग्राऊंडबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशीचे आदेश !

- मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 17 : खामगाव नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रावण टेकडीजवळ असून या ठिकाणी शहरातील दैनंदिन संकलन करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. या ठिकाणी आग लागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य संजय रायमुलकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री  सामंत म्हणाले, या नगरपरिषदेकडे रोज 3 हजार 206 टन इतका कचरा संकलन होतो आणि नगरपरिषदेकडे 1 हजार 314 टन क्षमता असलेला खत निर्मिती प्रकल्प आहे. या व्यतिरिक्त ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ (SBM 2.0) मध्ये नगरपरिषदेने 10 टन क्षमतेचा खत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित केला आहे.

नगरपरिषदेने 10 हजार टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली आहे. उर्वरित 18 हजार 241 टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेत ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0’ अंतर्गत केंद्र शासनाची मान्यता मिळण्याकरीता 1 कोटी रक्कमेचा कृती आराखडा सादर केला आहे, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!