टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

गट शिक्षणाधिकारी व विषय तज्ञ लाचेच्या जाळ्यात ! इयत्ता पहिली ॲडमिशन प्रक्रियेच्या एनओसीसाठी घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – गट शिक्षणाधिकारी व विषय तज्ञ लाचेच्या जाळ्यात अडकले. इयत्ता पहिलीच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या एनओसीसाठी 4500 लाच घेताना विषय तज्ञास रंगेहात पकडण्यात आले.

1. अशोक बापूराव सोळंके वय 46 वर्ष,विस्तार अधिकारी शिक्षण ( वर्ग-3 ) चार्ज गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मंठा.रा. गजानन नगर उघडा महादेव मंदिरा जवळ परभणी.
2. रामदास यादवराव माने वय-35 वर्ष,व्यावसाय विषय तज्ञ ( कंञाटी ) गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती मंठा. रा. पंचायत समिती क्वार्टर मंठा अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या नातीस ब्राईट इंग्लिश स्कूल मंठा या ठिकाणी इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायचे असल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या नातीचा महाराष्ट्र शासनाचे पूर्व प्राथमिक प्राथमिक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया RTE Act 2009 प्रमाणे फॉर्म भरल्याने तक्रारदार यांच्या नातीची 25 % शासकीय कोट्यामधून निवड झाली. त्यानंतर तक्रारदार यांना त्यांच्या नातीचे ॲडमिशन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय मंठा यांच्याकडून सर्व कागदपत्रे तपासून त्याबाबत एनओसी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी त्यांची कागद पत्रे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केली.

त्यानंतर तक्रारदार हे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आलोसे क्रमांक 2 रामदास यादवराव माने यांना भेटले. त्यावेळी आलोसे क्र. 2 रामदास यादवराव माने यांनी तक्रारदार यांच्याकडे आलोसे क्रमांक 01 अशोक बापूराव सोळंके यांच्यासाठी 5000/- रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी आज दिनांक 27. 08.2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो जालना येथे दिली.

सदर तक्रारीवरून आज दि. 27.08.2024 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आलोसे क्रमांक 2 रामदास यादवराव माने यांनी तक्रार यांच्याकडे पंचा समक्ष 5000/- रुपयांची मागणी करून आलोसे क्रमांक 01 अशोक बापूराव सोळंके यांच्या समक्ष तडजोडी अंती 4500 रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांना घेऊन येण्यास सांगितले असता आज रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्रमांक 02 रामदास यादवराव माने यांना लाचेची रक्कम 4500/- रुपये तक्रारदार यांच्या कडून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपी क्रं 1 व 2 यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – शंकर म.मुटेकर पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना, पर्यवेक्षण अधिकारी बाळू जाधवर, पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.जालना, सापळा पथक-
गजानन खरात, जावेद शेख, अतिश तिडके, भालचंद्र बिनोरकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!