छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल, शहानूर मियाँ दर्गा चौकात पेट्रोल पंप होणार ! महापालिकेच्या भंगार गाड्या आणि जुन्या लाईट फिटिंगचा लिलाव करण्याचे निर्देश !!

स्मार्ट सिग्नल करा, प्रत्येक झोनसाठी दोन जेटिंग मशीन खरेदी करा: प्रशासक जी श्रीकांत

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – शहर अभियंता विभागांतर्गत चालू आणि भविष्यात करण्यात येणारे विवीध विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश आज संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले. शहर अभियंता विभाग अंतर्गत विविध विषयांच्या आढावा घेण्यासाठी प्रशासकांनी आज सकाळी स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी रस्ते, ड्रेनेज, लाईट, ओपन स्पेस, सार्वजनिक शौचालय आदींचा आढावा घेतला. या सर्व विभागात सुरू असलेले काम तसेच भविष्यात करण्यात येणार्या कामांचा एक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. हर्सूल, शहानूर मियाँ दर्गा चौकात पेट्रोल पंप उभारण्यासह महापालिकेच्या भंगार गाड्या आणि जुन्या लाईट फिटिंगचा लिलाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी आम्हाला खेळू द्या उपकार अंतर्गत त्यांनी ओपन स्पेस किंवा खुल्या जागांची साफसफाई व सपाटीकरण बाबत विचारणा केली आणि सदरील ओपन स्पेसेस कार्यान्वित करून त्या परिसरातील नागरिकांना दत्तक देण्यात यावे आणि याची पुढची देखभाल व स्वच्छता ठेवणे याची जबाबदारी नागरिकांकडे राहील ते म्हणाले .

प्रत्येक वार्ड करिता दोन जेटिंग मशीन खरेदी करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेची सध्य स्थितीत मालमत्ता आणि भविष्यात निर्माण होणारी महापालिकेच्या इमारतींचे डिझाईन साठी एजन्सीचे पॅनल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. राजीव गांधी स्टेडियम समोरील व्यापारी संकुल दोन मजली करावे आणि एन ११ येथील भाजी मंडई नियमित करून द्यावे याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विद्युत विभागाचा आढावा घेताना त्यांनी सूचना केल्या की ट्रॅफिक सिग्नल स्मार्ट करावे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना केली. दि २६ जून रोजी संबंधित एजन्सी शहरातील सर्व सिग्नलचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करणार आहे. यावेळी गरवारे क्रीडा संकुल येथे फ्लड लाईट्स बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील प्रशासकांनी दिले. याशिवाय हर्सूल आणि शहानुर मियाँ दर्गा चौक येथे पेट्रोल पंप उभारणे ,महापालिकेची भंगार झालेली वाहने आणि जुनी लाईट फिटिंग यांचे लिलाव करणे. नारेगाव शाळा परिसर संरक्षित करण्यासाठी संरक्षित भिंत बांधावी प्रत्येक महापालिकेची शाळेची पाण्याची टाकी एक टँकर द्वारे रोज भरून देणे इत्यादी बाबत निर्णय दिले.

यावेळी सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त ०१ रणजीत पाटील ,शहर अभियंता ए बी देशमुख ,उपायुक्त तथा उद्यान आशिक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता आर एन संधा, डी के पंडित, बी डी फड, उपअभियंता विद्युत मोहिनी गायकवाड, उपअभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी ,सर्व वार्ड अभियंता ,जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ यांची उपस्थिती होती.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन- छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेले कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 20 जून रोजी समान वेतन वेळेवर, पगार, पीएफ इत्यादी मागण्यांसाठी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यांचे प्रतिनिधी यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली. यावेळी प्रशासकांनी दोन महिन्यांचा वेळ मागितलेला आहे. या दोन महिन्यात फेशियल अटेंडन्सची प्रणाली कार्यान्वित होऊन जाईल आणि सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याशिवाय समान वेतन पीएफ इत्यादी मागण्या वर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी प्रशासकांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!