पोलिस पाटील हरिदास हावळेंना ७० हजारांची लाच घेताना पकडले ! फोटो काढून वाळू उत्खननाची तक्रार न करण्यासाठी वरपला मलिदा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – वाळू उत्खननाचे फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना पोलिस पाटलाला रंगेहात पकडण्यात आले. हरिदास लिंबाजी हावळे (वय 51, पद – पोलीस पाटील, ढगपिंपरी, ता. परांडा, ज़िल्हा- धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांना मौजे ढगपिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदी पात्रातील वाळू उत्खनन करण्याचा लिलाव मिळाला होता. सदर वाळू घाटावर पाहणी साठी ग्राम दक्षता समिती नेमन्यात आली होती. सदर समितीचे सदस्य पोलिस पाटील हरिदास लिंबाजी हावळे (ढगपिंपरी , ता. परांडा) हे असून त्यांनी यातील तक्रारदार यांना तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय, त्याचे फोटो काढून महसूल विभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे धमकावले.
फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी पंचांसमक्ष यापूर्वी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे मान्य करून दिनांक 09.03.2023 रोजी 70,000/- रुपये लाचेची मागणी करून दिनांक 24.03.2023 रोजी 70,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने आरोपी पोलिस पाटील हरिदास लिंबाजी हावळे यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन परांडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर, सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक, धाराशिव, सापळा अधिकारी :- अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलीस अमलदार विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe