छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील पालच्या शेतात पोलिसांची छापेमारी ! शेडमध्ये लपवून ठेवलेल्या ५० गुटक्याच्या गोण्यासह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त !!

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. १- फुलंब्री तालुक्यातील पालच्या शेतात पोलिसांची छापेमारी करून शेडमध्ये लपवून ठेवलेला ५० गुटक्याच्या गोण्यासह 7,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शेतकर्यास अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

संतोष तेजराव जाधव (वय ३७ वर्षे रा. पाल ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांना दिनांक 31/08/2023 रोजी त्यांच्या गुप्तचातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलिस ठाणे फुलंब्री हद्दीतील पाल येथील एका व्यक्तीने त्याच्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये गोडावून तयार करून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटका हा विक्री करण्यासाठी साठवून ठेवला आहे. यावरुन मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पो. नि. स्थागुशा यांनी पथक तयार करून पाल शिवारातील शेत गट क्रमांक ६ मधील शेतातील पत्र्याच्या शेड नजिक दबा धरून सापळा रचला.

यावेळी पत्रा शेडच्या आतमध्ये संशयित व्यक्तीची हालचाल दिसून येताच स्थागुशाच्या पथकांने अचनाक छापा मारला असता तेथे संतोष तेजराव जाधव हा मिळून आला. त्या शेडमध्ये पांढ-या रंगाचे गोणपाटमध्ये पॅकिंग केलेल्या गोण्या ठेवण्यात आलेल्या होत्या. या गोण्याबाबत त्यास विचारपुस करता तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्याच्यावर अधिक संशय बळावला. त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपूस करता त्यांने सांगितले की या पांढ-या गोण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा १००० नावाचा गुटका असून या सर्व ५० गोण्यामध्ये गुटका भरलेला आहे.

यावरुन आरोपी संतोष तेजराव जाधव (वय ३७ वर्षे रा. पाल ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनग) यांने बेकायदेशीर रित्या, चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा १००० गुटख्याचे ५० गोण्या एकूण 7,32,000/- रुपयांचा साठवणूक करताना मिळुन आला. हा मुद्देमाल हा पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे फुलंब्री येथे भादवी कलम ३२८,१८८,२७२,२७३ सह कलम ५९ अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास फुलंब्री पोलिस करित आहेत.

ही कामगिरी मनीष कलवानिया, पोलीस अधिक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ, पोलीस निरीक्षक स्थागुशा, भगतसिंग दुलत, पोउपनि पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!