वैजापूर
Trending

वैजापूर शहरातील खानगल्लीत पोलिसांची छापेमारी ! कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ५८ जनावरांची सुटका, १३ जणांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – वैजापूर शहरातील खानगल्लीत पोलिसांनी छापा टाकला. कत्तलीसाठी ५८ जिवंत जनावरांना डांबून ठेवणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाटकांच्या तावडीतून सोडवणूक करून जनावरांना सुरक्षितरित्या रेणुकामाता गोशाळा हडस पिंपळगाव (ता. वैजापूर) येथे ठेवले आहे. सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (उपविभाग वैजापूर) यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.

दिनांक २३.०६.२०२३ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, वैजापूर शहरातील खानगल्ली येथे अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली आहे व काही जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस लोकांना विक्री करत आहे. ही खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला.

त्याठिकाणी १) मोबिन खान मेहबुब खान २) शेख महम्मद युसुफ कुरेशी ३) सादीख मुसा कुरेशी ४) लतीफ युसुफ कुरेशी ५) समीर मुसा करेशी ६) हमीद खान सुलतान खान ७) जाकीर इकबाल कुरेशी ८) दाऊद खान अमीर खान ९) समीर दाऊद कुरेशी १०) अझहर इकबाल कुरेशी ११) साजेद खा युसुफ खा १२) इसा युसुफ करेशी १३) सत्तार खान दगडु खान (सर्व रा. खान गल्ली वैजापूर ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) हे सदर ठिकाणी गोवंश जातीचे ५८ जिवंत जनावरे निर्दयतेने डांबून ठेवून काही जनावरांचे मांस लोकांना विक्री करताना मिळून आले. त्यांच्या विरुध्द पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान १६,३५,४५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात मिळून आलेले जनावरे यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदरचे जनावरे सुरक्षितरित्या रेणुकामाता गोशाळा हडस पिंपळगाव (ता. वैजापूर) येथे ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे (पोलीस ठाणे वैजापूर) करत आहे.

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापूर, सपोनी निशा बनसोड पोउपनि श्रीराम काळे, पोह गोलवाल, मपोना मोटे, मपोना भुरे, मपोना जाधव, पोना पैठणकर, पोना सरोदे, मपोकों पवार पोकों कदम, पोकों मोरे, पोकों जोनवाल, पोकों गायकवाड, पोकॉ घुगे यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!