छत्रपती संभाजीनगर
Trending

चिकलठाणा पोलिस स्टेशन हद्दीतील जीवन केसरसिंग जारवाल उर्फ राजपुत एम पी डी ए खाली स्थानबध्द !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी जिल्हयातील गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांविरुध्द कठोर भूमीका घेत त्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले आहे. जिल्हयातील धोकादायक गुन्हेगारी कारवाई करणारा सहावा आरोपी हा एम.पी. डी. ए कायदयाखाली हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे चिकलठाणा कार्यक्षेत्रातील जीवन केसरसिंग जारवाल उर्फ राजपुत (वय २५ वर्षे रा. बेंबळयाची वाडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याचे वाढते गुन्हेगारी व धोकादायक कारवायाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ चे कलम ३ (१) अन्वये स्थानबध्दतेचे आदेश दिनांक २०/०४/२०२३ रोजी जारी केले आहे.

जीवन केसरसिंग जारवाल उर्फ राजपुत याचे विरुध्द पोलीस ठाणे चिकलठाणा, वाळूज, हर्सुल, एम.आय.डी.सी वाळूज या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात चोरी, दुखापत, जिवे मारण्याच्या धमक्या व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली इत्यादी गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच प्रमाणे त्याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु त्याचा त्याचे वर काहीएक परीणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाया चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, ग्रामीण जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे पोना दीपक सुरोशे पोलीस ठाणे चिकलठाणा येथील पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर पोना किशोर काळवणे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!