शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसमोर आंदोलन ! केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा !!
आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषदेचा एल्गार
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ :- शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषदेने दिली.
जिल्हा परिषद अंतर्गत विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख , माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक , विषय पदवीधर शिक्षकांचे शेकडो पदे गेली अनेक वर्षांपासून रिक्त असून याचा विपरीत परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे. मागील वर्षभर प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून संघटनांनी पाठपुरावा सुरू ठेवला मात्र आंदोलने केली असता जिल्हा परिषदेने लेखी देऊन तात्काळ पदोन्नतीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एक वर्षे होत आले अध्यापही पदोन्नती याचबरोबर शिक्षक कर्मचारी कल्याण निधी हिशोब, डीसीपी एस धारक हिशोब, डीसीपी एस रक्कमेचे जमा व्याज, सह विविध प्रकारचे विषय दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषदच्यावतीने शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी दुपारी 1 ते 5 जिप कार्यालय समोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.
आंदोलन प्रसंगी खालील मागण्या करण्यात येणार आहेत
१) जेष्ठ विस्तार अधिकारी व कनिष्ठ विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पणे समुपदेशन घेऊन पूर्ण करावी, पदोन्नती साठी नकार देणारे शिक्षक यांना सक्ती करण्यात येऊ नये, सिंगल पदोन्नती आदेश देणे बंद करावे.
2) केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी .
३) जिल्ह्यातील मागील आठ वर्षांपासून विज्ञान गणित विषयाचे शेकडो पदवीधर पदे पदोन्नती प्रक्रिया न केल्याने रिक्त आहे, करीता तात्काळ पदवीधर विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षक मिळेल व होणारे शैक्षणिक नुकसान टळेल.
४) शिक्षक कर्मचारी कल्याण निधी योजना 2008 नंतर बंद पडलेली आहे, त्यानंतर शेकडो वेळा संघटनेने हिशोब मागितला आहे, मात्र आजपर्यंत जिप ने वर्गणीदार सदस्य यांना हिशोब दिलेला नाही, या जमा निधीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी झालेली असावी असा संशय वर्गणीदार सदस्य यांना वाटतो, कोट्यवधी रुपये जमा निधी हिशोब देणे आवश्यक असतांना प्रशासनाने कायमस्वरूपी टाळाटाळ केलेली आहे. या निधीचा दुरुपयोग होऊ नये , हिशोब दिल्याशिवाय यातील एकही पैसा खर्च करण्यात येऊ नये.
५) डीसीपीएयस धारक यांचे जिपकडे जमा रक्कम व त्यावरील व्याज याबाबत सबधितास तात्काळ हिशोब देण्यात यावा.
६) इतरत्र कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक यांना तात्काळ कार्यामुक्त करण्यात यावे.
७) सार्वत्रिक बदल्यात समानी करणं जागा मध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असल्याची चर्चा बदली धारक शिक्षकांमध्ये आहे, याची चौकशी करावी.
८) २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी लाभ देण्यात यावा.
९) बाल संगोपन रजा मंजुरीसाठी पंस ला अधिकार सुपूर्द करण्यात यावे.
१०) पदोन्नती, निवड श्रेणी, चटोपाध्याय , शिक्षण सेवक नियमित करणे, आशावेळी जिल्हा परिषद व पंस प्रशासन सतत शिक्षकांना गोपनीय अवहाल नव्याने आणायला सांगतात, अजब कारभार आहे, दरवर्षी सर्व शिक्षक गोपनीय अवहाल भरून केंद्र शाळा मार्फत पंस देतात, मग हे दरवर्षी चे गोपनीय अवहाल रद्दी म्हणून प्रशासन विकतात का?
यापुढे शासन निर्णय नुसार गोपनीय अवहाल प्रत शिक्षकांना देणे व एक प्रत केंद्रीय शाळेत ठेवणे आदी सह अन्य मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आदर्श शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील बरबंडे, संजीव देवरे, शिवाजी एरंडे, राजेश आचारी, किशोर पवार, ज्ञानेश्वर पठाडे, अनिल सोनवणे, बाबूलाल राठोड, नजीर शेख, भरत सदभावे, बाबासाहेब सांगळे, राजू बाविस्कर, शांताराम तोरणमल तर
शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष श्रीराम बोचरे, जगन ढोके, दिलीप गोरे, जिजा उकिरडे, शिवाजी दांडगे, गणेश चव्हाण ,सुखदेव दाभाडे,अयुब पटेल, आबा निकम , सुधाकर तरटे आप्पासाहेब चव्हाण ,अशोक निकम आदीने केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe