छत्रपती संभाजीनगर
Trending

जाबाज पोलिसांनी मुसळधार पावसात आरोपीचा तीन तास पाठलाग करून मुसक्या आवळल्या ! कमरेला लावलेल्या गावठी पिस्टलसह राहत्या घरातून उचलले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- पुंडलिकनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीस मुसळधार पावसात तीन तास पाठलाग करून गावठी पिस्टलसह जेरबंद केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलीकनगर पोलिस स्टेशनच्या हद्दी पोलिसांनी ही कारवाई केली.

पुंडलिकनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी गुड्डु उर्फ मॅक्स उर्फ शेख जुबेर शेख मकसूद (वय 37 वर्षे रा. विजयनगर, छत्रपती संभाजीनगर) हा काहीतरी घातपात करण्याच्या इराद्याने स्वत:जवळ पिस्टल बाळगून परिसरामध्ये पिस्टलचा धाक दाखवून धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीवरून कारवाई करण्यासाठी पोउपनि आनंद बनसोडे, पोउपनि एस.बी. काळे यांनी सूचना केल्याने पोलिस पथक रवाना झाले. आरोपीचा तीन तास मुसळधार पावसांत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा पाठलाग करुन शेवटी तो राहात्या घरी असल्याची माहिती मिळाल्यावरून दि. 23/09/2023 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमरास राहत्या घरातून त्यास शिफासतीने ताब्यात घेतले. त्यांचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल व त्यात एक बुलेट मिळून आले.

सदरचे पिस्टल व बुलेट त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. सदर आरोपीने विना परवाना बेकायदेशीर रित्या अग्निशस्त्र बाळगले म्हणून पोलीस नाईक जे.बी. मान्टे यांच्या फिर्यादीवरुन गुड्डू उर्फ मॅक्स उर्फ शेख जुबेर शेख मकसुद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी गंभीर दुखापत, गैरकायद्याची मंडळी जमवून हमला व शासकीय कामात अडथळा, खंडणी, अपक्रिया असे पो.स्टे. मुकुंदवाडी व पो.स्टे. पुंडलीकनगर येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (उस्मानपुरा विभाग) डी. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री आडे पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुंडलीकनगर, स.पो.नि. शेषराव खटाणे, आनंद बनसोडे, संदीप काळे, स. फा. व्हि. व्ही. मुंढे, पोना जालींदर मान्टे, गणेश डोईफोडे, दीपक देशमुख, पो.अ. कल्याण निकम, संदीप बिडकर, प्रशांत नरवडे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!