छत्रपती संभाजीनगर
Trending

सिनर्जी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेला मिठी मारली ! अश्लील शिवीगाळ करून धमकावले, दोघांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – सिनर्जी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेला मिठी मारल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याचा जाब विचारण्यास गेलेल्या सदर महिला व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा संतापजनक प्रकार २१ सप्टेंबर रोजी व २४ सप्टेंबर रोजी सिनर्जी हॉस्पिटल, एन २ सिडको, मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुभाष मुनंडे व गोविंद जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी या सिनर्जी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असताना सुभाष मुंडे यांनी मिठी मारून आवळून धरले. त्यामुळे फिर्यादीस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच सदर घटनेबाबत फिर्यादीचे पती आणी फिर्यादी हे दिनांक 24/09/2023 रोजी दुपारी 02.00 वाजता सिनर्जी हॉस्पिटलमध्ये सुभाष मुंडे यांना जाब विचारण्यासाठी गेले असता सुभाष मुंडनी अश्लिल शिवीगाळ करून महिला फिर्यादीच्या पतीस हाताचापटाने मारहाण केली.

तसेच गोविंद जाधव यांनी देखील अश्लिल शिवीगाळ करून नंतर पाहून घेवू अशी धमकी दिली. आरोपी पासून फिर्यादी यांच्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये सुभाष मुनंडे व गोविंद जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि दिलीप बचाटे हे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!