राहुल गांधींना सुरत कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा ! सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे ? या वक्तव्याव्यर ठरवलं दोषी !!
सुरत, दि. २३ -: काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना गुजरात राज्यातील सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सन 2019 मध्ये मोदी आडनावाच्या विधानाबाबत खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात हा खटला सुरू होता. या खटल्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले. कोर्टाने राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेच त्यांना जामीन मंजूर करत शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली.
मानहानीच्या एका प्रकरणात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात राज्यातील सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुरत न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांची उदाहरणे देत सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे ? असा सवाल उपस्थित केला होता.
राहुल गांधी यांच्या या विधानावरून निवडणुकीदरम्यान चांगलाच गदारोळ झाला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात गुजरातचे भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. ज्यात राहुल गांधींना गुरुवारी सुरत कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सुरत सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १५ हजार रुपयांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने निकाल देतानाच खासदार राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe