वैजापूर, वीरगाव, शिऊर परिसरातील हॉटेल्सवर धाडी ! देशी, विदेशी दारूचा साठा जप्त करून १७ जणांवर गुन्हे !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – वैजापूर, वीरगाव, शिऊर परिसरातील हॉटेल्सवर धाडी टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली. सहायक पोलीस अधीक्षक, महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शिवजयंती निमित्ताने उपविभाग वैजापूर मधील तीन पोलीस स्टेशन हद्दीत ड्राय डे निमित्ताने अवैध दारू विक्री वर धाडी टाकल्या. देशी, विदेशी, गावठी दारूचा 76,200 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने ड्राय डे निमित्ताने वैजापूर उपविभागातील पोलीस स्टेशन वैजापूर, वीरगाव, शिऊर या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल, ढाबे याठिकाणी महक स्वामी सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने छापे मारून एकूण 16 केसेस केल्या. त्यामधे देशी, विदेशी, गावठी दारूचा 76,200 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात प्रामुख्याने वीरगाव पो.स्टे.ने 4 केसेस, शिऊर पो.स्टे.ने 3 केसेस, वैजापूर पो.स्टे. ने 01 आणि sdpo कर्यालाचे पथकाने 8 केसेस केलेल्या आहेत.
तसेच शिवजयंती निमित्ताने कलम 68/69 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 13 जणांना ताब्यात घेऊन कार्यवाही करून सोडण्यात आले. शिवजयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाहीत या करिता खबरदारी म्हणून 61 जणांवर कलम 149 सी.आर.पी.सी. अन्वये नोटिस देऊन पावबंद करण्यात आले.
महक स्वामी सहाय्यक पोलीस अधीक्षक, वैजापूर उपविभाग,यांनी धाडीमध्ये अग्रेसर राहून कारवाई केली. उपविभागात अवैध धंद्यांवर कारवायांचा धडाका कायम ठेऊन अवैध धंदे वाल्यांवर वचक निर्माण केला आहे.
महक स्वामी यांच्या अचानक व धडक मोहीमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे मुसक्या आवळल्या आहेत. ज्यामुळे शिवजयंती उत्सव हा अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या सह psi काळे, पोलीस अंमलदार पडळकर, गोलवाल, कदम, महिला पोलिस अंमलदार मोठे, गाधेकर व तीनही पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी केली.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the छत्रपती संभाजीनगर Live channel on WhatsApp:👇
https://whatsapp.com/channel/0029Va9cQwH1HspwZDjxdY29 - पुढील मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट
9923355999