छत्रपती संभाजीनगर
Trending

लव्ह मॅरेजवरून साले मेव्हण्यात राडा, मारहाण करून पोटात चाकू हल्ला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – माझ्या बहिणीसोबत लव्ह मॅरेज का केले यावरून साले मेव्हण्यात वाद झाला. वादाचे रुपांतर चाकुहल्ल्यात झाले. यात एक जण जखमी झाला.

ही घटना दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता औरंगाबाद शहरात घडली. विशाल किशोर सौदागर (रा. नागसेन नगर, उस्मानपुरा, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

यासदंरभात फिर्यादी आनंद उत्तम त्रिभुवन (रा. नागसेननगर, उमानपुरा औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती असी की, फिर्यादी व आरोपी है नात्याने साले मेव्हने आहेत. यातील फिर्यादीने आरोपीच्या बहिणीसोबत लव्ह मॉरेज केलेले असून तू माझ्या बहिणीसोबत लव्ह मॅरेज का केले या कराणावरून वाद झाला.

यातील आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करुन त्याच्या हातात असलेल्या चाकुने मारहाण करुन जखमी केले. यात फिर्यादीच्या पोटाला दोन टाके पडले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी आनंद उत्तम त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये विशाल किशोर सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ जाधव करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!