देश\विदेश
Trending

दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत बदलून घ्या बॅंकेतून नोटा !

नवी दिल्ली, दि. १९ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची वेळ दिली आहे. दरम्यान, २ हजार रुपयांच्या नोटांची छपाईही यापूर्वीच थांबवण्यात आलेली आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा सर्व बॅंकेत राहणार आहे. बॅंकानी यापुढे ग्राहकांना २ हजारांच्या नोटा देऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) म्हटले आहे की, 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात येत आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलण्याची वेळ रिझर्व्ह बॅंकेने लोकांना दिली आहे. या काळात लोकांनी या नोटा बँकेतून बदलून घ्याव्या.

उल्लेखनीय बाब म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि ५०० ​​रुपयांच्या नोटांवर एका रात्रीत बंदी घातली होती. या नोटाबंदीचा लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. २०१६ च्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. दरम्यानच्या काळात ही छपाई थांबवण्यात आली.

काही दिवसांपासून सोशल मीडियातून २ हजारांच्या नोटा बाद होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्या दृष्टीने आरबीआयने आता हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट होते. या नोटा बदलून घेताना बॅंकेत झुंबड उडू नये, दिवसभर रांगेत उभा राहण्याची वेळ लोकांवर येऊ नये यासाठी बँकांनी ग्राहकांना तत्परतेने सुविधा देणे आवश्यक आहे. यापूर्वी नोटा बदलून घेण्यासाठीचा लोकांचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे बँकांनी जबाबदारी स्वीकारून ग्राहकांना वेळेत व तत्पर सुविधा द्याव्यात.

Back to top button
error: Content is protected !!