महाराष्ट्र
Trending

पोलिसांच्या कंत्राटी भरतीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा प्रखर विरोध !

मुंबई, दि. २५ – राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत २८९ अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रखर विरोध दर्शविला आहे.

गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीत सहायक शिपाई ते सहायक निरीक्षक अशी ४० हजार ६२३ पदे मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती दानवे यांनी परिषद सभागृहात दिली. एकीकडे केंद्र सरकार २ कोटी रोजगार देण्याची घोषणा करते तर दुसरीकडे ९ खासगी संस्थाना वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार देण्यासाठी नेमणूक सरकारने केली आहे.

जगात स्कॉटलंड यार्ड धर्तीवर मुंबई पोलिसांची ओळख आहे. असे असताना कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलेला निर्णय हा चुकीचा असून पोलीस हे सरकारी अखत्यारीतच असले पाहिजे, अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलीस भरतीला कडाडून विरोध दर्शविला.

Back to top button
error: Content is protected !!