महाराष्ट्र
Trending
निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार निलंबित, तीन महिन्यांत मालमत्तेची चौकशी करणार !
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, दि. 27 : ठाणे तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्धची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल तसेच त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली.
सदस्य अमित साटम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित विभागाकडून पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला असून तो मान्य करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe