महाराष्ट्र
Trending

बीडमध्ये गुंडाराज, वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली ! पळून जाणाऱ्या भरधाव कारचालकाला पाठलाग करून पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- रोवर मध्यभागी उभ्या केलेल्या कारचालकाला दंड ठोठावल्याच्या रागातून कार चालकाने थेट वाहतूक पोलिसाच्या अगावर गाडी घालून धडक दिली. एवढेच नाही तर वाहतूक पोलिसाला धडक दिल्यानंतर त्याने कार दामटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. ही घटना बीड शहरातील सांगली बँक कॉर्नर परिसरातील पायल मुनोत कपड्याच्या दुकानासमोर घडली. सावतामाळी चौक, बीड येथे पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. या घटनेत डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले.

अक्षय तुकाराम खोपे (रा. गुंजथडी ता. माजलगाव जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. विष्णू उद्धवराव काकडे (वय 40 वर्षे, व्यवसाय नोकरी पोह, नेमणुक शहर वाहतूक शाखा बीड) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. वाहतूक पोलिस विष्णू उद्धवराव काकडे यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सांगली बँक कॉर्नर, सुभाष रोड बीड येथे कर्तव्यावर होतो. दिनाक 26/07/2023 रोजी 16.00 वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिस विष्णू उद्धवराव काकडे व सोबत पोना मुंडे असे सांगली बँक कॉर्नर सुभाष रोड बीड येथे वाहतूक नियमन ड्युटी करत असताना पायल मुनोत कपड्याच्या दुकानासमोर एक फिकट निळसर रंगाची टाटा कंपनीची व्हिस्टा चारचाकी कार (क्र. MH14CC7768) रोडवर मध्यभागी सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा पध्दतीने उभा होती.

तेव्हा सदर गाडी कोणाची आहे हे वाहतूक पोलिस डिवाईस मशीनवर चेक करत असताना सदर कारचा चालक तेथे आला. त्यावर वाहतूक पोलिस विष्णू उद्धवराव काकडे यांनी त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय तुकाराम खोपे (रा. गुंजथडी ता. माजलगाव जि. बीड) असे सांगितले. त्यानंतर वाहतूक पोलिस विष्णू उद्धवराव काकडे यांनी त्याला तुझी कार रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने उभी असल्याने तुला ऑनलाईन नो पार्कींगसाठी 500/- रु. दंड भरावा लागेल असे सांगितले. यावर त्याने तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ते, जा तुम्हाला काय करायचे ते करा, मी दंड भरणार नाही असे तो पोलिसांना म्हणाला.

त्यांनंतर वाहतूक पोलिस विष्णू काकडे हे त्याच्या कारसमोर जाऊन थांबले व सोबत असलेले पोना मुंडे हे ड्रायव्हर साईटच्या काच मधून सदर कार चालकाला दंड भरल्याशिवाय कार नेता येणार नाही असे सांगत होते. त्यावरही कार चालकाने कार स्टार्ट करून सरळ वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांच्या अंगावर बेदरकारपणे कार चालवली. तेंव्हा वाहतूक पोलिस विष्णू काकडे हे तात्काळ बाजुला होण्याचा प्रयत्न करत असतांना त्या कार चालकाने वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांना जोराची धडक देवून खाली पाडले. यात वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांच्या हातातील डिवाईस मशीन फुटले.

त्यानंतर वेगाने कार चालवून तो तेथून पळून गेला. त्यानंतर वाहतूक पोलिस विष्णू काकडे व पोना मुंडे दोघांनी मोटार सायकलवरून त्याचा पाठलाग केला. त्याला सावतामाळी चौक, बीड येथे पकडून त्याला त्याच्या कारसह बीड शहर पोलिस स्टेशनला आणले. त्यानंतर पो.स्टे. बीड शहर येथील ठाणे अंमलदार यांनी पत्रक देऊन वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांना वैद्यकीय तपासणी कामी सरकारी दवाखाना, बीड येथे उपचारकामी पाठवले. सरकारी दवाखाना, बीड येथे उपचार घेतले. तेथील डॉक्टरांनी वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांच्या डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर असल्याचे सांगितले.

याप्रकरणी वाहतूक पोलिस विष्णू काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये अक्षय तुकाराम खोपे (रा. गुंजथडी ता. माजलगाव जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!