छत्रपती संभाजीनगर
Trending

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान, चिकलठाणा विमानतळ भूसंपादन मोबदला, वैजापूरच्या विविध प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांबाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. 19 -: जिल्ह्यातील विविध विषयांबाबत गुरुवार दि.20 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. ही बैठक विधान भवनातील मुख्यमंत्री महोदयांच्या समिती कक्षात दुपारी तीन वाजता होणार आहे.

या बैठकीस राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक, संत ज्ञानेश्वर उद्यान (ता. पैठण) पुनर्विकास, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे वेरूळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणी, अजिंठा लेणी विकास प्रकल्प, चिकलठाणा विमानतळ भूसंपादन मोबदला तसेच वैजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!