छत्रपती संभाजीनगर
Trending

अ‍ॅडव्होकेटची स्कुटी पेट्रोल ओतून पेटवली, घरासमोर आग लावली ! केस केली म्हणून सहा जणाच्या टोळीकडून दगडफेक करून हैदोस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – केस केली म्हणून अ‍ॅडव्होकेटची स्कुटी पेटवली. घरासमोरही आग लावली. घरात शिरून दांड्याने मारहाण करून पळून जाताना दरवाज्यावर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.

1) आनंद मिसाळ, 2) धम्मपाल तुपे, 3) गजेंद्र भांडे, 4) अनिल होगे, 5) दिलीप सवडे, 6) योगेश अहिरे (सर्व राहणार महूनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात फिर्यादी किरण प्रकाश राजपुत (वय 32, रा. कमलनयन बजाज हॉस्पिटल समोर, गट बीड बायपास रोड, सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 07/05/2023 रोजी 00.10 वाजेच्या सुमाराम फिर्यादी अॅडव्होकेट किरण राजपुत यांच्या राहते घरी 1) आनंद मिसाळ, 2) धम्मपाल तुपे. 3) गजेंद्र भांडे, 4) अनिल होगे. 5) दिलीप सबडे, 6) योगेश अहिरे (सर्व राहणार महूनगर, छत्रपती संभाजीनगर) हे चालून आले.

कोर्टात त्यांच्या विरुद्ध कलम 156(3) Crpc प्रमाणे केस का केली या कारणावरून आरोपींनी  तलवार, लाकडी दांडा, पेट्रोल घेऊन अॅडव्होकेट किरण राजपुत यांची स्कुटी जाळून घरासमोर आग लावली. घरात शिरुन अॅडव्होकेट किरण राजपुत यांना लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ केली. हॉलमधील कपाटातून 30,000/- रुपये घेऊन पळून गेले. त्यानंतर घराच्या पाठीमागील बाजुच्या दरवाजावर दगडफेक करून जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अॅडव्होकेट किरण प्रकाश राजपुत (वय 32, रा. कमलनयन बजाज हॉस्पिटल समोर, गट बीड बायपास रोड, सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) आनंद मिसाळ, 2) धम्मपाल तुपे. 3) गजेंद्र भांडे, 4) अनिल होगे. 5) दिलीप सबडे, 6) योगेश अहिरे (सर्व राहणार महूनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शेळके करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!