छत्रपती संभाजीनगर
Trending

वाढदिवसाच्या बॅनरवरून तलवार उपसली, छत्रपती संभाजीनगरात दोन गट भिडले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – वाढदिवसाचे बॅनर लावल्यावरून दोन गट भिडले. एकाने तलवार उपसली मात्र, समोरच्याने ती तलवार दोन्ही हाताने अडवल्याने पुढील अनर्थ टळला. दुसऱ्या गटानेही मारहाण केली. ही घटना छत्रपती संभाजीनगर मिटमिटा दाराव हाँटेल शक्ती धामजवळ घडली. या याप्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.

सय्यद फारूख सयद सादीक (वय25, रा. दौलताबाद कुंभारवाडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1)शेख अनिस शेख नईम 2) आरीफ सयद (दोही रा. अब्जीमंडी दौलताबाद) यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद फारूख सयद सादीक यांच्या माहितीनुसार ही घटना दिनांक 06/05/2023 रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास दाराव हाँटेल शक्ती धामजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

याप्रकरणी सय्यद फारूख सयद सादीक यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की,फिर्यादी सय्यद फारूख सयद सादीक व आरोपी 1) शेख अनिस शेख नईम 2) आरीफ सयद हे ओळखीचे आहेत. यातील फिर्यादी सय्यद फारूख सयद सादीक त्यांच्या भावाच्या वाढदिवसा निमित्त मेट्रो हॉटेल अब्जीमंडी येथे बॅनर लावले. यावेळी आरोपी 1)शेख अनिस शेख नईम 2) आरीफ सयद हे त्यांना म्हणाले की, आमच्या वस्तीमध्ये बॅनर लावू नका याकारणावरुन आरोपीतांनी 1)शेख अनिस शेख नईम 2) आरीफ सयद मिळून फिर्यादी सय्यद फारूख सयद सादीक यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. शेख अनिस शेख नईम याने त्याच्या गाडीला लावलेली तलवार काढून म्हणाला तुझे हात पाय तोडून तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. सय्यद फारूख सयद सादीक यांना मारत असतांना त्यांनी तलवार दोन्ही हातांनी धरली.

शेख अनिस शेख नईम (वय २६, रा. अब्जीमंडी दौलताबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद फारूख उर्फ मुन्नाभाई सय्यद सादीक व अक्षय बोडखे (दोन्ही रा. दौलताबाद) यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शेख अनिस शेख नईम याने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना 06/05/2023 रोजी 22.00 वाजेच्या सुमारास दादाराव हाँटेल शक्ती धाम मिटमिटा छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

याप्रकरणातील आरोपीने फिर्यादीस फोन करून दादाराव हॉटेल येथे बोलावले. त्यानुसार फिर्यादी शेख अनिस शेख नईम हे तेथे गेले असता आरोपी फिर्यादीस म्हणाला की, मी लावलेले बॅनर तू का फाडले या कारणावरुन यातील आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. व फारूख उर्फ मुन्नाभाई याने शेख अनिस शेेख नईम यांना लाथ मारून खाली पडले. यात ते जखमी झाले.

दरम्यान, दोघांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोह काळे हे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!