सातारा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक २४ हजारांची लाच घेताना चतुर्भुज ! गुन्ह्याच्या तपासात तक्रारदाराला मदत करण्यासाठी घेतली लाच !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – सातारा पोलिस स्टेशन पोलिस उप निरीक्षकांना २४ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात तक्रारदाराला मदत करण्यासाठी त्यांनी लाच घेतली.
मच्छिन्द्र बापूराव ससाणे (वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी, पोलीस उप निरीक्षक (ग्रेड psi), नेमणूक सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार व इतर यांच्या विरुद्ध सातारा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक मच्छिन्द्र बापूराव ससाणे यांच्याकडे होता. या प्रकरणात पोलिस उप निरीक्षक मच्छिन्द्र बापूराव ससाणे यांनी तक्रारदार यांना मदत करण्यासाठी 25000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 24000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून पंचा समक्ष लाचेची रक्कम 24000/- रुपये स्वीकारली.
ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित,पोलिस उप अधीक्षक, सापळा अधिकारी संदीप राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पो अ केवलसिंग गुसिंगे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रेय होरकटे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe