देश\विदेश
Trending

दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही, आधारकार्ड व पॅनकार्डचीही गरज नाही, SBIचे सर्कुलर जारी !

नवी दिल्ली, दि. २१ – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि विरोधकांसह सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. आरबीआयच्या निर्णयानुसार 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत लोकांना देण्यात आली आहे. RBI नंतर आता SBI ने एक मार्गदर्शक तत्व जारी करून नोटा बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही फॉर्मची गरज भासणार नाही. कोणतेही ओळखपत्र किंवा कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे, असे पत्र एसबीआयने जारी केले आहे.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने  दिनांक 19 मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि लोकांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयाकडे आणखी एक नोटाबंदीचा प्रकार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, ही नोटाबंदी नाही. दोन हजार रुपयांच्या मोठ्या प्रमाणात बानावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या नोटेचा वापर काळा पैसा लपवण्यासाठी केला जात असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एक रुटीन प्रोसेस आहे.

30 सप्टेंबर 2023 पर्यंतच आहे मुदत

ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते बँकेत जमा करू शकतात. यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. 23 मे 2023 पासून, कोणत्याही बँकेत एका वेळी दोन हजार रुपयांच्या 10 नोटा बदलून त्या बदल्यात दुसर्या नोटा मिळू शकतील. म्हणजे एका वेळी एकून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, बॅंकेत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास कोणतीही मर्यादा नाही. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांची नोट बदलून देण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.

‘क्लीन नोट पॉलिसी’धोरणांतर्गत RBI ने दोन हजारांच्या नोटा बंद केल्या

‘क्लीन नोट पॉलिसी’ या धोरणांतर्गत RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांमध्येही बनावट नोटांचा भरणा असल्याचे बोलले जात आहे. काळा पैसा जमा करण्यासाठी अनेक लोक या नोटेचा वापर करत होते. अशा स्थितीत ही नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!