महाराष्ट्र
Trending

दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत !

- मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

मुंबई, दि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.

दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!