छत्रपती संभाजीनगर
Trending

लासूर स्टेशन परिसरात दरोडा घालणारा आरोपी उस्मानपुऱ्यातून जेरबंद ! करमाड, जालन्यासह तीन गुन्हे उघडकीस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१- दोन वर्षांपासून फरार असलेला दरोड्यातील आरोपीस शिल्लेगांव पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरातून अटक करण्यात आली. ३ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान, आगाठाण शिवारातील (लासूर स्टेशन) येथे घातलेल्या दरोडा प्रकरणात पोलिसांना तो हवा होता. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे करमाड, जालन्यासह तीन गुन्हे उघडकीस आले आहे.

विशाल उर्फ मोगली भास्कर तांगडे (वय २३ वर्षे रा मिसारवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. दिनांक १५/११/२०२१ रोजी फिर्यादी संजय जवरीलाल चंडालीया (वय ५६ वर्षे धंदा व्यापार रा. लासूर स्टेशन ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती की, त्याचे आगाठाण शिवारातील शेत गट ६९ मध्ये साई बालाजी कॅन्ट्रक्शन अँन्ड अलाईज प्रा. लिमीटेड नावाची कंपनी आहे. दि.१५/११/२०२१ रोजी तीन ते चार वाजेच्या सुमारास कंपनीतील वॉचमन यांना अज्ञात चोरट्याने मारहाण करून केबिनमध्ये कोंडून कंपनीतील एकूण ६,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता.

गुन्हयात दि.१८/११/२०२१ रोजी आरोपी १) मोबीन मोहब्बत खान वय ४१ वर्षे २) नईमखाँन महेमुदखाँन वय ३४ वर्षे ३) अजय मधुकर त्रिभुवण (वय २० वर्षे तिघे रा. मिसारवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर) ४) विनोद लक्ष्मण जाधव वय २२ वर्षे रा. साठेनगर वाळूज छत्रपती संभाजीनगर ५ ) शहीनशहा शब्बीरशहा ६) भीमराव वानखडे दोन्ही रा. पिंपळखुटा ता. पातूर जि. अकोला ७) शेख जुनेद शेख हबीब रा. जिन्सी छत्रपती संभाजीनगर ८) विशाला उर्फ मोगली भास्कर तांगडे वय २० वर्षे रा. मिसारवाडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी सदरचा गुन्हा केला केल्याचे निष्पन्न झाल्याने या आरोपीस यापूर्वीच अटक करून त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला पोलीस ठाणे शिल्लेगांव, करमाड, चंदनझीरा, असा एकूण १३४६२२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता.

आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात आलेले आहे. गुन्हयातील फरार आरोपी विशाल उर्फ मोगली भास्कर तांगडे (वय २३ वर्षे रा मिसारवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर) हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. तो अटक होवू नये म्हणुन मुंबई येथे राहत होता. तो दि. १९/०८/२०२३ रोजी उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर भागात आला आसल्याचे पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रिलायक बातमी मिळाली होती.

त्यावरून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक पथक दिवसभर त्याच्या मागावर राहून तो रात्रीच्या वेळी उस्मानपुरा बैध्द विहार परिसरात त्याच्या मित्रासोबत बसलेला मिळून आला. त्यास मोठ्या शिताफीने पोउपनि नजीर शेख, पोना विठ्ठल जाधव, पोना सुनिल सोनवणे, पो.अ. राजेद्र निसर्गे, चालक पो.अ. पठाण यांनी अटक केली.

त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे सहका-यासोबत नमुद व करमाड, चंदझिरा (जि.जालना) येथे अल्युमिनिय चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हार्सल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे केली आहे. आरोपीकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!