महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप ! शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट !!
मुंबई, दि. २८ – राजकारणात काहीही होवू शकतं असं आजपर्यंत जे बोललं जात होतं ते महाराष्ट्रातील राजकारण्यांनी खरंही करून दाखवलेलं आहे. मागील दीड वर्षांपासून एकगठ्ठा आमदारांची ईकडून तिकडं म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा (त्यांच्या भाषेत उठाव करण्याचा) जो सुपरफास्ट प्रवास सुरु आहे त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होवू शकतं याचं आश्चर्य आता जनतेला वाटणार नाही. परंतू शरद पवार म्हटले की, अखेरच्या क्षणी धक्कातंत्र देवून बाजी आपल्या बाजूने वळवण्यात ओळखले जातात. दरम्यान, आज शिंदे गटातील खंदे समर्थक तथा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली आणि राजकीय गोटात चर्चा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडच्या काळात भूकंप होवू शकतो याची.
आज मुंबई येथे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दrपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली, एवढीच माहिती शरद पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली अन् चर्चा सुरु झाली. दरम्यान, देशाचे ज्येष्ठ नेते, आदरणीय खा. शरदजी पवार यांची आज सदिच्छा भेट घेतली. शालेय व माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये होत असलेले बदल, अपेक्षित सुधारणा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारण अशा विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
या दोन दिग्गज नेत्यांनी दिलेल्या या माहितीवर विश्वास ठेवू शकते का ? याला कारणही तसेच आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर तब्बल ४० पेक्षा ज्यास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत सत्ता स्थापन केली. वर्षभरानंतर तर काकाला धक्का देत पुतने अजित पवार यांनी तर थेट शरद पवारांवर टीकास्र सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाबरोबरच्या सत्तेस सहभागी झाले. अगदीचे पहाटेचा शपथविधी असो की आत्ताचा दुपारचा शपथविधी. दोन्ही वेळी महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणात काहीही होवू शकते, याचा प्रत्येय खर्या अर्थाने महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे.
महाराष्ट्रातील एकाही पक्षाला स्पष्ट कौल नव्हता. मात्र, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने मुसंडी मारली होती. भाजपा आपल्याच गर्वात असताना इकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची मोट बांधून शरद पवारांनी भिन्न विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेवून महाविकास आघाडी स्थापन केली. देशाच्या इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरेंच्या हाती मुख्यमंत्रीपादाची सूत्रे दिली. याचा वचपा भाजपाने अखेर काढलाच. अख्खी शिवसेना खिळखिळी केली. तब्बल ४० पेक्षा ज्यास्त आमदारांना सोबत घेवून महाविकास आघाडीला सत्तेवरून खाली खेचले. राष्ट्रवादीचेही तेच हाल केले.
एवढे सर्व राजकारण घडत असताना शरद पवारांच्या चालीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. यातच शिंदे गटाचा मातब्बर नेता दीपक केसरकर हे शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय गोटात चर्चा सरु झाली ती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाची. आता येणारा काळ हा राजकारणात किती हादरे देतो आणि त्या महाराष्ट्राच्या किती पचणी पडतात हे लवकरच समजेल. मी पुन्हा येईन असा सोशल मीडियावर आवाज घूमत असला तरी प्रत्यक्षात आगामी निवडणुकीनंतर सत्तेवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून असली तरी पवारांची चाल ही निर्णायक असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe