महाराष्ट्र
Trending

नांदेड अमृतसर, जम्मू तावी हमसफरसह काही रेल्वे तात्पुरत्या रद्द ! मथुरा रेल्वे स्थानकावरील कामासाठी मेगा लाईन ब्लॉक !!

नांदेड, दि. २३- लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मथुरा रेल्वे स्थानकावर यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य करण्याकरिता घेण्यात येणाऱ्या मेगा लाईन ब्लॉक मूळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचे उत्तर मध्य रेल्वे ने कळवले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दिनांक 21 जानेवारी ते 04 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2. अमृतसर येथून सुटणारी गाडी क्र. 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस दिनांक 23 जानेवारी ते 06 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
3. नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12751 नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 26 जानेवारी आणि 02 फेब्रुवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.

4. जम्मू तावी येथून सुटणारी गाडी क्र. 12752 जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 28 जानेवारी आणि 04 फेब्रुवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
5. नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 12753 नांदेड-हजरत निजमुदिन साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 30 जानेवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
6. हजरत निजमुदिन येथून सुटणारी गाडी क्र. 12754 हजरत निजमुदिन- नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 31 जानेवारी, 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.

1. पंजाब राज्यातील किसान आंदोलनामुळे दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ला अमृतसर येथून सुटणारी गाडी क्र. 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस अंबाला येथून सुटेल. अमृतसर ते अंबाला दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!