महाराष्ट्र
Trending

गंगापूर वैजापूर रोडवरील पत्र्याच्या शेडवर पोलिसांची छापेमारी, जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – गंगापूर शहरातील गंगापूर वैजापूर रोडवरील हॉटेल ग्रॅच्युएट चहाच्या दुकाना शेजारील सार्वजनिक ठिकाणी पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकून जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांनी छापा टाकल्याची पाहून काही जण पळून गेले मात्र, पोलिसांनी तिघांना पकडले. घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह ८१,०७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

१) राहूल सुभाष अन्नदाते वय ४२ वर्षे, रा. भानसहिवरा, ता. नेवासा, २) नारायण गोविंद घाटे वय ४९ वर्षे, रा. शिंगी ता. गंगापूर, ३) सुरेश सावळीराम काळे वय ३२ वर्षे, रा. नेवासा ता. नेवासा अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपनिरीक्षक मधुकर रंगनाथ मोरे (स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) यांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक २३/११/२०२३ रोजी १०:०० वाजता पोह रविंद्र लोखंडे, पोह विठ्ठल डोके, पोह गोपाल पाटील अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करणेकामी गंगापूर येथे शिवाजी चौक येथे असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गंगापूर-वैजापूर रोडवरील ग्रॅच्युएट नावाच्या चहाच्या हॉटेलच्या बाजुच्या पत्र्याच्या शेडमध्ये मागील बाजूस काही जण आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित आहेत.

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलिसांनी पंचनाम्यातील नमूद दोन पंच यांना बोलावून मिळालेली माहिती देवून पंचांना सदर ठिकाणी जुगार रेडसाठी पंच म्हणून समक्ष हजर राहणेबाबत कळवले. पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अचानक १२:३० वाजता छापा टाकला. छापा टाकताच पोलिसांना पाहून काही जण पळून गेले.

सदर पत्र्याच्या शेडमध्ये तीन जणांना पोलिसांनी जागीच पकडले. पकडलेल्या तिघांनी त्यांची नावे १) राहूल सुभाष अन्नदाते वय ४२ वर्षे, रा. भानसहिवरा, ता. नेवासा, २) नारायण गोविंद घाटे वय ४९ वर्षे, रा. शिंगी ता. गंगापूर, ३) सुरेश सावळीराम काळे वय ३२ वर्षे, रा. नेवासा ता. नेवासा असे सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी मटका, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.

Back to top button
error: Content is protected !!