पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार ! जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह विदर्भाच्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय !!
नांदेड, दि. २६ – महाराष्ट्रात ‘आषाढी एकादशी’ हा एक महत्त्वाचा सण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यंदा आषाढी एकादशी 29 जून रोजी येत आहे. मंदिराजवळील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पवित्र नगरी पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातील चार महत्त्वाच्या स्थानकांवरून म्हणजे नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या धावणार आहेत.
विधर्भातून ही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने अकोला ते पंढरपूर आणि पंढरपूर ते अकोला अशी विशेष गाडी चालवण्याचे ठरवले आहे. या विशेष गाड्यांना लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 01 एसी III-टियर, 09 स्लीपर आणि 07 जनरल सिटिंग, 02 एस.एल.आर असे 19 डब्बे जोडण्यात आले आहेत.
विशेष रेल्वे सेवांचे तपशील खाली दिले आहेत – अनु क्र. गाडी क्र. पासून-पर्यंत प्रस्थान आगमन, दिनांक (दिवस) वेळ दिनांक वेळ
1) 07505 अकोला-पंढरपूर 27.06.2023 (मंगळ) 11.00 28.06.2023 (बुध) 09.20
2) 07506 पंढरपूर-अकोला 28.06.2023 (बुध) 21.50 29.06.2023 (गुरु) 19.45
1. गाडी क्रमांक 07505 अकोला ते पंढरपूर विशेष गाडी:- ही विशेष गाडी अकोला येथून 27 जून ला सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेदाम, चीत्तपूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे दिनांक 28 जून ला सकाळी 09.20 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07506 पंढरपूर- अकोला विशेष गाडी:- ही विशेष गाडी पंढरपूर येथे दिनांक 28 जून ला रात्री 21.50 वाजता सुटेल आणि कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, चीत्तपूर, सेदाम, तांदूर, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम मार्गे अकोला येथे दिनांक 29 जून ला रात्री 19.45 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, एसी II टियर, एसी III टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe