महाराष्ट्र
Trending

शेवगावात दोन्ही बाजूंनी दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज ! अकोल्यात कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश, इंटरनेटवरही बंदी !!

लोकांनी शांतता राखावी व अफवांवर विश्वास ठेवू

मुंबई, दि. १५ – अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला असून दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झालेे तर अकोल्यात किरकोळ वादातून दोन गटांत हिंसक हाणामारी झाल्याने कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून  इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि अकोला शहरात हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण असले तरी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही घटनांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या हिंसक चकमकीत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या हिंसाचारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये आणि अकोला शहरात तणावाचे वातावरण आहे. अहमदनगरच्या शेवगाव शहरात दोन बाजूंनी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचवेळी किरकोळ वादातून अकोल्यात दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. दोन्ही घटनांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या हिंसक चकमकीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर हाणामारीत सहभागी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिरवणुकीवर दगडफेक
रविवार, 14 मे रोजी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली होती. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रात्री ८ वाजता मिरवणूक काढण्यात आली असता, अचानक एका गटाने दगडफेक केली. दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार, आधी धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली, त्याला प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.

यामुळे व्यापार्यांना आपली दुकाने बंद करावी लागली. त्याचवेळी जमावाने काही दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आतापर्यंत शंभर पेक्षा ज्यास्त अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षाात घेता राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या सध्या शेवगावमध्ये तैनात आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

अकोल्यात 144 प्रतिबंधात्मक आदेश, इंटरनेटवरही बंदी- शनिवार, 13 मे रोजी अकोल्यात किरकोळ वादातून दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले. हिंसक घटनेनंतर ओल्ड सिटी पोलिस स्टेशनच्या बाहेर मोठ्या जमावाने मोर्चा काढला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोल्यात यावेळी कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पेव फुटू नये म्हणून इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवरील एका वादग्रस्त पोस्टमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे काही जणांनी पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली होती. याचवेळी पोलिस ठाण्यात जमाव अनियंत्रित झाला आणि त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड सुरू केली. काही वेळातच दुसऱ्या गटाचे लोक पुढे आले आणि त्यांनीही दगडफेक सुरू केली. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार धूमश्चक्री उडाली. नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

दरम्यान, लोकांनी शांतता राखावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!