छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न ! चादरीचे काठ फाडून लोखंडी पट्ट्याला लटकण्याचा प्रयत्न !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – हर्सूल कारागृहातील न्याधीन बंदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शासकीय चादरीचे साईडचे काठ पाडून दरवाजाच्या लोखंडी पट्टीला लटकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना २५ सप्टेंबर रोजी १३.३० वाजेच्या सुमारास अतिसुरक्षा विभाग बॅरेक नंबर ५ मध्यवर्ती कारागृह हर्सूल छत्रपती संभाजीनगर येथे घडली. शेख जमीर उर्फ कौची शेख सलीम (अतिसुरक्षा विभाग बॅरेक नंबर ५ मध्यवर्ती कारागृह हर्सूल छत्रपती संभाजीनगर) असे त्या न्यायाधिन बंदीचे नाव आहे.

फिर्यादी यांनी सरकार तर्फे तक्रार दिली की, यातील आरोपी हे न्यायाधिन बंदी असून आरोपीताने अतिसुरक्षा विभाग बँरेक नंबर 05 मधील दरवाज्याला लोखंडी आडव्या पट्याला शासकीय चादरीचे साईडचे काठ फाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कारागृह शिपाई दत्तात्रय प्रभाकर मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये न्यायधिन बंदी शेख जमीर उर्फ कौची शेख सलीम (अतिसुरक्षा विभाग बॅरेक नंबर ५ मध्यवर्ती कारागृह हर्सूल छत्रपती संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह गाडेकर करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!