छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

तलाठी व त्याचा पंटर लाचेच्या जाळ्यात ! शेतीचे वाटणीपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी १८ हजार घेतले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २- वडिलोपार्जीत शेतीचे वाटणीपत्र करून 7/12 वर नोंद घेण्यासाठी पंटरमार्फत १८ हजारांच्या लाचेच्या जाळ्यात तलाठी अडकला. आमठाण्याच्या तलाठ्यासह त्याच्या पंटरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सिल्लोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

1)संजय दिगंबर विसपुते, वय 48 वर्ष, पद-तलाठी, वर्ग-3 मौजे आमठाणा, तालुका-सिल्लोड, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर), 2) गजानन भिकन सोमासे (वय,26 राहणार, आमठाणा ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती गट क्र.427मधील 0.89R त्यांच्या वडिलांच्या नावावर असून त्याचे वाटणीपत्र करून 0.60R शेतजमिनीची तक्रारदार यांच्या नावाची नोंद 7/12 ला घेणेकरिता यातील आरोपी यांनी पंच साक्षीदार यांच्या समक्ष 20000/रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 18000/- रुपये रक्कम आरोपी क्र.2 गजानन सोमासे यांच्या मार्फतीने स्वीकारली.

याप्रकरणी 1)संजय दिगंबर विसपुते, वय 48 वर्ष, पद-तलाठी, वर्ग-3 मौजे आमठाणा, तालुका-सिल्लोड, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर), 2) गजानन भिकन सोमासे (वय,26 राहणार, आमठाणा ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर)  यांना ताब्यात घेतले असून सिल्लोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  20000 रुपयांच्या लाचेची मागणी दि.29/11/2023 रोजी करण्यात आली तर तडजोडीअंती 18000 रुपयांची लाच दि 1/12/23 रोजी स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर ,प्रभारी अपर पोलिस अधीक्षक, सापळा पथक – पोहवा पाठक , पोअ केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!