छत्रपती संभाजीनगर
Trending

परभणी जिल्ह्यातील राणीसावरगावच्या शिक्षकाला छत्रपती संभाजीनगरात लुटले ! मुकुंदवाडीत कोयत्याने तीन गाड्याही फोडल्या !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- परभणी जिल्ह्यातील शिक्षकाने छत्रपती संभाजीनगरात नवे घर घेतले असून त्याच्या कामानिमित्त घरासमोर उभे असताना दोन हल्लेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले. तीन गाड्याही कोयत्याने फोडल्या. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील छत्रपती कॉलनीत रात्रीच्या सुमारास घडली.

रमेश गंगाराम नरहिरे (वय 52 वर्षे धंदा. नोकरी रा. छत्रपती कॉलनी घ. न. 78 मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे शिक्षकाचे नाव आहे. ते परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून नोकरीवर आहेत. त्यांनी छत्रपती कॉलनी येथे नविन घर घेतले असून त्याचे बांधकाम सध्या चालू आहे.

दिनांक 10/03/2023 रोजी रात्री 21.15वाजेच्या सुमारास शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे, त्यांची पत्नी, वॉचमन अशोक बळीराम डरफे, नातेवाईक परशुराम पाटेकर हे उभे होते. त्यावेळी शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांच्या घरासमोर दोन अनोळखी आले. त्यापैकी एकाच्या हातात कोयता होता. यातील एकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तर दुस-याने शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांच्या खिश्यात हात घातला व पैसे काढत होता तेवढ्यात बाजुला असलेल्या वॉचमनने सोडवासोडव करण्यासाठी सदर अनोळखीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने वॉचमन अशोकच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला.

शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांच्या खिश्यातील 1800/-(अठराशे रुपये) बळजबरीने काढून घेतले. तेवढ्यात गल्लीत राहणारे प्रशांत बागुल हे त्यांच्या इलेक्ट्रिक मॅगनीझ ग्रीव्हीज कंपनीची गाडीवर आले असता त्यांच्यावर सुध्दा हल्लेखोर चालून गेले. त्यांच्या गाडीचे कोयत्याने नुकसान केले. शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांची सुझकी ACCESS 125 या गाडीचे सुध्दा कोयत्याने मारून नुकसान केले. तसेच शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांचे नातेवाईक परशुराम सखाराम पाटेकर यांची गाडी बजाज सीटी 100वर सुध्दा कोयत्याने मारून नुकसान केले व त्यांचे खिशातून 1000/- रुपये रोख रक्कम  काढून घेतले.

जिवे मारण्याची धमकीही दिली. तुम्ही येथे कसे राहता असे म्हणाल्यावर शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांनी घाबरुन आरडाओरडा केल्यामुळे आजुबाजुचे राहणारे लोक जमा झाले. तेव्हा सदर हल्लेखोराने त्याच्या हातातील कोयता फिरवला अन् म्हणाला की जर कोणी माझ्या मध्ये आले तर त्याला सुध्दा मारून टाकीन असे धमकावून ते दोघे हल्लेखोर तेथून पसार झाले.

याप्रकरणी शिक्षक रमेश गंगाराम नरहिरे यांनी पोलिसांना दोन संशयितांची नावे सांगितली असून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!