सहाय्यक पोलीस उप निरीक्षकाने जामीन मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागितली !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी २ हजारांची लाच मागणी करणार्या सहाय्यक पोलिस उप निरीक्षक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाचेची मागणी केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सिची चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भागिनाथ विष्णू अंगुने (वय 56 वर्ष, पद – सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (वर्ग3), सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग कार्यालय औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचा त्यांचे चुलत भाऊ यांच्यासोबत घरगुती भांडण (वाद) झाले होते. त्या भांडणांमध्ये तक्रारदार यांच्यावर पोस्टे वेदांत नगर मध्ये भा.द.वि 324 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असून यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग ह्या कार्यालयातून जामीन मिळवून देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष दोन हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून पो स्टे सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
14/06/2023, 15/06/2023, 26/06/2023 व 12/07/2023 या तारखांना लाचमागणी आणि पडताळणी करण्यात आली. २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी तक्रारदारांकडे केली होती.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – दीपाली निकम, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोना सुनील पाटील, अशोक नागरगोजे, पोअंम विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe