आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !
महिला बालकल्याण विभागाच्या विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा, चला पौष्टीक जेवण करुया उपक्रम राबवणार

- गर्भसंस्कारातून सुरुक्षित मातृत्व आणि सुदृढ बालक- या उपक्रमातून गर्भवती महिलांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन तज्ञ डॉक्टार मार्फत अनुभवी मार्गदर्शकामार्फत करुन हे मार्गदर्शन आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईल द्वारे गावोगावी पोहचवण्याचा कार्यक्रम राबविणार असून यामधून सुदृढ बालक आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित राहील.
औरंगाबाद, दि.12 :- महिलांच्या आरोग्य व पोषणा संदर्भात असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवावी असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये प्रसुती पूर्व लिंग निदान चाचणी प्रतिबंध समितीसह विविध योजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
‘गर्भसंस्कार’ व ‘चला पौष्टीक जेवण करुया’ या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असून यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी पाण्डेय यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे दयानंद पाटील, मैत्रे, सुमन प्रकल्पाच्या समन्वयक प्रज्ञा सोनवणे, एनपीसीडीएस चे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.जावेद कुरेशी, जिल्हा गुणवत्ता कार्यक्रमचे जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य मिशन , राष्ट्रीय तंबाखु कार्यक्रम नियंत्रण समन्वयक यांची उपस्थिती होती.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
गर्भवती व स्तनदा माताना मातृवंदना योजनेसह विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी बँकेत त्यांचे खाते आधारक्रमांक नुसार उघडण्यात यावेत. विवाहानंतर नावात बदल केला असेल किंवा आधार क्रमांकावर विवाह पूर्वीचे नाव असेल तरी सदरील योजनेचा लाभ देण्यासाठी नावात बदल करण्याची सक्ती करु नये. त्यांना वेळेत योजनेचा लाभ देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे यावेळी सांगितले.
चला पौष्टीक जेवण करुया
या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. अन्नधान्यातून पौष्टिक जेवण हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 2023 हे वर्ष ‘तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश आणि स्थानिक पातळीवरील उत्पादीत होणाऱ्या अन्नधान्याचा वापर आहारात करुन सकस व पौष्टीक आहार माता, बालक व प्रत्येक नागरिकांना मिळावा. वयोगटानुसार आवश्यक असलेले अन्नघटक याविषयी मार्गदर्शन व जाणिवजागृती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय सामिती स्थापन करुन यात सुमन कार्यक्रम समन्वयक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश यावेळी दिले.
गर्भसंस्कारातून सुरुक्षित मातृत्व आणि सुदृढ बालक- या उपक्रमातून गर्भवती महिलांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन तज्ञ डॉक्टार मार्फत अनुभवी मार्गदर्शकामार्फत करुन हे मार्गदर्शन आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईल द्वारे गावोगावी पोहचवण्याचा कार्यक्रम राबविणार असून यामधून सुदृढ बालक आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित राहील. भविष्यात कुपोषण व महिलांच्या तक्रारी निर्माण होणार नाही यामुळे हे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी समिती स्थापन करुन अंमलबजावणी करावी.
कन्नड-सोयगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार महिलांच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर संबंधित तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसिलदार यांनी प्राधान्याने याकडे लक्ष देऊन अडचणी सोडवाव्यात.
जिल्हा तंबाखु नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात तंबाखु व गुटखा खाण्यास व विक्रीवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच तंबाखु नियंत्रण प्रतिबंध क्षेत्राचे संदेश दर्शनी भागात रंगविण्यात यावेत अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शाळा महाविद्यालयाच्या आवारात तंबाखु व गुटखा विक्री होणार नाही. तसेच अश्या परिसरात संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील जैव कचरा संकलन आणि विल्हेवाट वेळेत करुन तो त्याची योग्य प्रकारे लावण्याचे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना संबंधित एजन्सीला दिले. तालुका पातळीवरील जैव कचरा संकलनाच्या तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी संबंधित एजन्सीने घ्यावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
कायाकल्प या उपक्रमाअंतर्गत सर्व आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण स्वच्छता सेवा सुविधा उपलब्धते मध्ये शासनाने ठरवून दिलेले मानांकन मिळवणे महत्वाचे आहे. यासाठी जिल्हा समन्वयकांनी लक्ष देण्याची गरज असून पुढील बैठकीमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना यांनी दिले.
One Comment