छत्रपती संभाजीनगर
Trending

पाचोडच्या बॅंक मॅनेजरला लुटणारी टोळी जेरबंद ! जालना, बीडसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील २२ गुन्हे उघडकीस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – पोलीस स्टेशन करमाड येथील दरोडचा गुन्हा उघडकीस करुन आरोपीच्या टोळीला अटक करण्यात आली. डिझेल चोरीचे एकून २२ गुन्हे, मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे, एक दरोडयाचा गुन्हा उघडकीस आला. जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या टोळीने धूमाकूळ घातला होता. पाठलाग करुन कोंबिंग ऑपरेश राबवून शिताफिने त्यांना अटक करण्यात आली.

प्रशांत गणेश गायकवाड (वय २३ वर्षे रा. कोळघर ता. जि. संभाजीनगर), अभिषेक ऊर्फ रावण प्रताप गवारे (२१, सोडसावंगी ता. अंबड जि.जालना), गजानन विठ्ठल बर्डे (२१, रा. रामनगर साखर कारखाना ता. जि. जालना) यांनी व त्यांना गुन्हयात साथ देणारे त्याचे साथीदार हर्षद भगवान गंगतीरे (२९, रा. दुसरबिड ता. सिंदखेडराजा जि.बुलढाणा ह.मु. कोळघर ता. जि. संभाजीनगर), प्रकाश गणेश भंडारे (१९, रा. आडगांव ठोंबरे ता.जि. संभाजीनगर), प्रदीप गणेश गायकवाड (२२, रा. कोळघर), सतिष विलास मुगदल (२३, रा. कोळघर), राहुल पुंजाराम मुगदल (३५, कोळघर) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक १६/११/२०२२ रोजी फिर्यादी रविंद्र रामनाथ मगरे (व्यवसाय खाजगी नौकरी (फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक शाखा पाचोड येथे सेन्ट्रल मॅनेजर) रा. कोळी बोडखा ता. पैठण जि. संभाजीनगर) यांनी पोस्टे करमाड येथे तक्रार दिली की, दि. १६/११/२०२२ रोजी दुपारी ०१.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे बँकेच्या बचत गटाचे कर्जाची वसुली करून कोळघर ते घारेगाव रस्त्याने मोटार सायकलने (क्र. एमएच २० जीजी ०६१७) जात होते. पुलाच्या जवळ बॅंकेचे मॅनेजर रविंद्र रामनाथ मगरे यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर तीन अनोळखी जण आले.

त्यापैकी एकाने डोक्यात मारुन बॅंकेचे मॅनेजर रविंद्र रामनाथ मगरे यांच्याकडे असलेल्या बॅगमधील १,४८,३५० रुपये रोख रक्कम, २. ९०००/- एक सॅमसंग कंपणीचा टॅब, ३. १२००/- मंत्रा मशीन (बायोमॅट्रीक मशीन) एकूण १,५८,५५/- चोरून नेले. बॅंकेचे मॅनेजर रविंद्र रामनाथ मगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन करमाडला  गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक एम.आर. खोकले यांचे आदेशावरून पोउपनि रामेश्वर ढाकणे यांच्याकडे देण्यात आला.

पोलिसांनी गुप्त माहीती काढली असता सदरचा गुन्हा प्रशांत गणेश गायकवाड (वय २३ वर्षे रा. कोळघर ता. जि. संभाजीनगर), अभिषेक ऊर्फ रावण प्रताप गवारे (२१, सोडसावंगी ता. अंबड जि.जालना), गजानन विठ्ठल बर्डे (२१, रा. रामनगर साखर कारखाना ता. जि. जालना) यांनी व त्यांना गुन्हयात साथ देणारे त्याचे साथीदार हर्षद भगवान गंगतीरे (२९, रा. दुसरबिड ता. सिंदखेडराजा जि.बुलढाणा ह.मु. कोळघर ता. जि. संभाजीनगर), प्रकाश गणेश भंडारे (१९, रा. आडगांव ठोंबरे ता.जि. संभाजीनगर), प्रदीप गणेश गायकवाड (२२, रा. कोळघर), सतिष विलास मुगदल (२३, रा. कोळघर), राहुल पुंजाराम मुगदल (३५, कोळघर) यांनी संगणमताने गुन्हा केल्याची खात्रीशिर माहीती पोलिसांना मिळाली.

आरोपींचा शोध घेवून पाठलाग करुन कोंबिंग ऑपरेश राबवून शिताफिने त्यांना अटक करण्यात आली. आरोपीतांची पोलिस कोठडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्हयातील गेला मालापैकी सॅमसंग कंपनीचा टॅब, मंत्रा मशीन (बायोमॅट्रीक मशीन), १२२३०/- रुपये नगदी हस्तगत करण्यात आले. त्या व्यतीरीक्त सदर आरोपीकडून १० मोबाईल, पोस्टे गेवराई व पोस्टे अंबड हद्दीतून चोरून आणलेल्या दोन पल्सर मोटार सायकली, दोन चाकू, एक कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.

सदर गुन्हयातील आरोपींना पीसीआर मध्ये असतांना विचारपूस केली असता त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार खालील गुन्हे उघडकीस आले.

१. पोलिस स्टेशन करमाड गुरन ४३७/२२ कलम ३७९, ३४ भादवी (डिझेल, मोबाईल चोरी/ कबुली तपास चालु) सदर गुन्हयात आरोपी राहूल राधाकिसन कोकाटे (रा. मम्मादेवीनगर जालना) यास दि.०२/१२/२०२२ रोजी अटक करण्यात आलेली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सदर गुन्हयात तिघांना अटक केली आहे. एकूण ६ आरोपी निष्पन्न

२. पोलिस स्टेशन करमाड गुरन २५७/२०२२ कलम ३७९, भादवी (डिझेल चोरी / कबुली तपास चालू)

३. पोलिस स्टेशन अंबड जि जालना गुरन ८१२ / २०२२ कलम ३७९ भादवी ( मोटार सायकल चोरी/ जप्त )

४. पोलिस स्टेशन गेवराई जि बीड गुरन ५४४ / २०२२ कलम ३७९ भादवी (मोटार सायकल चोरी/जप्त ).

५. पोलिस स्टेशन अंबड जि जालना गुरन ८१५/२०२२ कलम ३७९ भादवी ( मोटार सायकल चोरी/कबुली) तसेच या व्यतिरीक्त सदर गुन्हे करणाऱ्या टोळीने खालील प्रमाणे २० ते २२ ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली आरोपीतांनी दिली आहे.

१. एम आय डी सी जालना

२. झाल्टा फाटा

३. जालना ते छत्रपती संभाजीनगर रोड

४. जालना अंबड रोड

५. शिर्डी- लासुर रोड

६. छत्रपती संभाजीनगर ते पाचोड बीड रोड

७. पुणे मुंबई रोडवर

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलसी अधिकारी जयदत्त भवर यांच्या व पोलिस निरीक्षक एम आर खोकले यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि बाबा राठोड, पोउपनि दादासाहेब बनसाडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलिस हेड कॉस्टेबल चव्हाण, विक्रम जाधव, संजय जगताप, पोलिस नाईक सुनील लहाने, सुनील गोरे, शिवाजी मदेवाड, जयसिंग नागलोत, कृष्णा ढाकरे पोअं/ नामदेव धोंडकर, पोअं/ शकुल बनकर यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मदत केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे पोस्टे करमाड करीत आहेत.

सध्या दि. ०८/१२/२०२२ रोजी तीन आरोपींना पोलिस स्टेशन करमाड गुरन ४३७/२०२२ कलम ३७९, ३४ भादवी हा डिझेल चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन झाल्याने त्यांना अटक करुन त्यांची पोलिस कोठडी दि ०८/१२/२०२२ ते दि. १२/१२/२०२२ होती. त्यांनी डिझेल चोरीचे एकून २२ गुन्हे, मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे, एक दरोडयाचा गुन्हा उघडकीस आला असून अधिक तपास सुरु आहे.

सदर गुन्हातील आरोपी पैकी प्रशांत गणेश गायकवाड, अभिषेक ऊर्फ रावण प्रताप गवारे, गजानन विठ्ठल बर्डे हे तीन आरोपी सध्या डिझेल चोरीच्या पोस्टे गुरनं. २५७/२०२२ कलम ३७९ भादवी गुन्हयामध्ये अटक व दि.१५/१२/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.

Back to top button
error: Content is protected !!