
संभाजीनगर, दि. १५ ः सुतगिरणी चौकातील पूजा बियर शॉपीमध्ये १२ डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास राडा झाल्याचे काल, १४ डिसेंबरला समोर आले. मोठ्या हसल्याने जाब विचारत दोघांच्या डोक्यात बाटल्या फोडल्या आल्या.
अर्जुन अशोक खरात (३८, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) व त्याचा साला अमोल दीपक साबळे अशी जखमींची नावे आहेत. दोघे पूजा बियर शॉपीत किंगफिशर बियर पिण्यासाठी गेले होते. काऊंटरवरून बियर घेऊन ते पित असताना शॉपीत आधीच काबरानगर येथील विशांत सावंत, सचिन उर्फ तांबे (रा. सुतगिरणी क्वार्टर) बसलेले होते.
अर्जुन व अमोल दोघे गप्पा मारत असताना अमोल मोठ्या हसला. त्यामुळे विशाल व सचिन त्यांच्याकडे आले व मोठ्याने का हसला असा जाब विचारला. अमोल त्याला तुमच्याकडून बघून हसलो नाही, असे सांगत असतानाच दोघांनी त्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. त्यामुळे तो ओरडत बाहेर पळाला.
त्याचवेळी विशालने अर्जुनच्या तोंडावर बाटली फोडली. त्यामुळे अर्जुनही जखमी झाला. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही दोघांनी दिली. बियर शॉपीच्या मालक व वेटरने भांडण सोडवून नातेवाइकांना बोलावले. त्यांनी दोघांना रामनगरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जवाहरनगर पोलिसांत अर्जुनने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सचिन व विशालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सीताराम केदारे करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe