रेल्वे पटरीच्या बाजूला उभे राहून काठी मारून मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन टोळीचा छत्रपती संभाजीनगरात फर्दाफाश ! चोरीच्या मोबाईल विक्रीचे नांदेड व बीड कनेक्शन !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- रेल्वेमध्ये दरवाजात बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल काठी मारून हिसकावणाऱ्या टोळीचा मुकुंदवाडी विशेष पथकाने पर्दाफाश केला. तब्बल 38 पेक्षा जास्त मोबाईल हस्तगत करून एकूण 430300/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील ही तीनही मुले अल्पवयीन असून ते त्यांच्या साथीदारांच्या मदतीने चोरीचे हे मोबाईल बीड आणि नांदेडमध्ये विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
दि. 11/07/2023 रोजीचे 1200 वाजता पोलीस ठाणे मुकुंदवाडी विशेष पथकाचे पोलीस उप-निरीक्षक पंकज मोरे व अंमलदार हे पोस्टे हदितील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा शोध घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, रेल्वे गेट नं. 56 मुकुंदवाडी येथे काल रात्री रेल्वेमध्ये चोरी केलेला मोबाईल विकण्यासाठी तीन मुले येणार आहे. सदर माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक ससे यांच्या आदेशाने मुकुंदवाडीचे विशेष पथकाचे अधीकारी व अंमलदार यांनी आरोपीतांना पकडण्यासाठी रेल्वे गेट नं.56 येथे सापळा रचला.
काही वेळाने तीन मुले तेथे आले. त्या तीन मुलांना पोलिसांनी जागीच पकडले. ते तिघेही अल्पवयीन निघाले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुरवातीला तीन मोबाईल मिळून आले. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, दररोज सायंकाळी येणारे रेल्वेचे वेळेला हे तिघे चिकलठाणा रेल्वे स्टेशन ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचे दरम्यान रेल्वे पटरीच्या बाजूला उभे राहून त्यांचेतील एक जण थोड्या अंतरावर थांबून कोणता डब्यातील पॅसेंजर हा रेल्वे डब्याच्या दरवाजामध्ये फोनवर बोलत थांबला आहे याचा इशारा समोर उभे असलेल्या त्याचे साथिदारांना देत होता.
त्यानुसार मग पुढे थांबलेले दोघे हे त्यांचे हातातील काठीने त्या मानसा जवळील मोबाईल खाली पाडून तो उचलून चोरी करत होते. सदर प्राथमिक चौकशी वरून ताब्यात असलेल्या अल्पवीन मुलांनी नंतर त्यांच्याकडे असेलेले एकूण 38 मोबाईल (किंमत 430300/- रुपये) काढून दिले. तसेच काही मोबाईल हे त्यांचे साथिदार नांदेड व बीड येथे विक्री साठी दिल्याची कबुली दिली आहे. सदर जप्त मोबाईल संबंधाने पोलीस ठाणे रेल्वे औरंगाबाद येथे बरेच गुन्हे ( 300 चेवर) दाखल असून ते निष्पन्न करण्याची कार्यवाही चालू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त लोहिया, पोलीस उप आयुक्त नांदेडकर, सहा. पोलीस आयुक्त रंजीत पाटील उस्मानपुरा, मा. पोनि गुरमे गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी विशेष पथकाचे पोनि ससे, पोउपनि पंकज मोरे, पोह नरसिंग पवार पोह बाबासाहेब कांब पोलीस अंमलदार अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, शैलेश अडीयाल, दिनेश राठोड चालक प्रभाकर पाटील यांच्या पथकाने पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe