महाराष्ट्र
Trending

अंबाजोगाईजवळील चिंचखेडी चौकात कारचालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले ! पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आवळल्या मुसक्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- मित्राकडे जेवणाची मेजवाणी घेऊन परतीला अंबाजोगाईला निघालेल्या कारला तिघांनी हाताचा इशारा देऊन थांबवले. त्यानंतर त्यातील एकाने चालकाच्या गळ्याला चाकू लावून खिशातील ४ हजार रुपये काढून घेतले. प्रतिकार केल्याने चाकूहल्लाही केला. एवढेच नव्हे तर लहान मुलालाही मुका मार दिला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे गाठले अन् घडलेली सर्व माहिती पोलिसांना दिली. काही तासांतच पोलिांनी त्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर जखमीने त्या तिघांना ओळखले.

प्रदीप शामलाल मोदी (वय 53 वर्षे व्यवसाय शेती राहाणार गुरुवार पेठ अंबाजोगाई जि बीड) असे जखमीचे नाव आहे. मोदी यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 11/07/2023 रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ते व त्यांचा मुलगा यश प्रदीप मोदी व साहील शिरीष देशमुख हे कारने मौजे गांडदेवाडी येथे यात्रा असल्याने मित्र राहुल रघुनाथ गडदे याच्याकडे जेवन करण्यासाठी निघाले. प्रदीप शामलाल मोदी हे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गडदेवाडी येथे पोहचले व तेथे जेवन करुन मुलगा व त्याचा मित्र रात्री पावणे आकरा वाजेच्या सुमारास परत अंबाजोगाई येथे येण्यासाठी निघाले.

त्यांची कार चिचखंडी चौकामध्ये आकरा वाजता आली असता चिंचखडी चौकामध्ये एक पांढ-या रंगाची स्विफ्टकार उभी होती व त्यातील तीन व्यक्ती रोडवर उभे होते. त्या तिघांनी प्रदीप शामलाल मोदी यांची कार थांबवण्यास हाताने इशारा केला. त्यामुळे प्रदीप शामलाल मोदी यांनी कार थांबवली. ते तिघेजण कारजवळ आले व त्यातील एका व्यक्तीने त्याच्या जवळील चाकू काढून प्रदीप शामलाल मोदी यांच्या गळयाला लावला. अन्य दोघे पम्या त्यांच्या खिशातील पैसे काढ असे म्हणत होते.

त्यानंतर पम्या नावाच्या व्यक्तीने प्रदीप शामलाल मोदी यांच्या शर्टच्या वरच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले. प्रदीप शामलाल मोदी यांनी त्यास आडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकूने वार करून जखमी केले. तसेच इतर दोघां पैकी एकाने कारच्या समोरच्या भागावर दगड मारून काच फोडली व दुस-या व्यक्तीने प्रदीप शामलाल मोदी यांच्या मुलास चापटाने मुक्का मार दिला. त्यानंतर प्रदीप शामलाल मोदी यांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण गाठले. तेथे पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमी प्रदीप शामलाल मोदी यांना अंबाजोगाई येथे उपचारासाठी पाठवले.

सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथून उपचार करून तक्रार देण्यासाठी प्रदीप शामलाल मोदी हे पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथे पोहोचले असता त्यांना समजले की लूटमार करणारी स्विफ्ट कार पोलीसांनी ताब्यात घेतली असून त्या कार मधील व्यक्ती देखील ताब्यात घेतले आहे. प्रदीप शामलाल मोदी यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या खिशातील पैसे काडणारा व्यक्ती व त्याच्या सोबतचे इतर दोन जणांना मोदी यांनी ओळखले.

त्यांनी त्यांची नावे प्रमोद ऊर्फ पम्या बळीराम थाटकर (वय 24 वर्षे रा धनगर गल्ली अंबाजोगाई), अशोक विष्णू धरने (वय 25 वर्षे रा येल्डा ता अंबाजोगाई), दिनेश पुरुषोत्तम देवकते (वय 29 वर्षे राहाणार येल्डा ता अंबाजोगाई) असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!