संभाजीनगर व धाराशिवच्या नामांतरावरून कोणी कोर्टात जायला हवं, अस शिंदे फडणवीस सरकारला वाटतंय !
संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत सरकारची भूमिका संशयास्पद, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आरोप
लातूर – औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने काढलेल्या परीपत्रकात तफावत आहे. यावरून संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद वाटते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
आज लातूर येथे शिवगर्जना अभियान कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्राने नामांतराच्या परिपत्रकात दुरुस्ती केली पाहिजे. संपूर्ण जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करावं. नामांतराच्या मुद्द्यावरून कोणी कोर्टात जायला हवं अस राज्य सरकारला वाटतंय की काय अशी शंका देखील दानवेंनी राज्य सरकारच्या हेतूबद्दल बोलून दाखवली.
केंद्र व राज्य सरकारने काढलेल्या नामांतराच्या परीपत्रकात एकसंधता यायला हवी, अन्यथा नामांतरला गडांतर येऊ शकतं अशी भीती देखील दानवे यांनी व्यक्त केली. संघर्षानंतर हे नामांतर झालं त्यावर पाणी पडू नये असं मत दानवे यांनी व्यक्त केलं.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe