महाराष्ट्र
Trending

जालना जिल्हा बॅंकेची मंठा शाखा फोडली, तिजोरी मजबूत असल्याने चोरट्यांनी हात टेकले ! सेक्युरेटी गार्डही नाही, अलार्म सिस्टिमही बंद, शेतकऱ्यांच्या ठेवी असुरक्षित !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – जालना जिल्हा बॅंकेची मंठा शाखा चोरट्यांनी फोडली. तिजोरी उघडण्यासाठी चोरट्यांनी प्रचंड मेहनत घेतली मात्र लोखंडी तिजोरी मजबूत असल्याने चोरट्यांकडून ती उघडली नाही. यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. विषेश म्हणजे या बॅंकेला सेक्युरेटी गार्डही नाही. याशिवाय अलार्म सिस्टिमही बंद आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या ठेवी वाचल्या मात्र, बॅंक प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पावले उचलण्याची गरज आहे.

श्रीधर ज्ञानदेव सरकटे (वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी शाखाधिकारी, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मंठा ता. मंठा जि.जालना रा. वझर सरकटे ता. मंठा हम वांजोळा पुनर्वसन ता. मंठा जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते शाखाधिकारी म्हणून जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मंठा येथे सन 2011 पासून कार्यरत आहे.

बँकेत शासनाच्या विविध अनुदानाचे रकमा, बचत खाते, मुदत ठेव खाते आदी खात्यातील रक्कम काढणे व जमा करणे अशाप्रकारच्या दैनंदिन पैशाचे व्यवहार होत असतात. तसेच उपशाखा १) तळणी २) दहिफळ ३) जयपूर या शाखांना कॅश पुरवली जाते. त्यासाठी मंठा शाखेमध्ये 15 लाख रुपये ठेवण्याची मर्यादा आहे. तसेच सध्या बँकेची अलार्म सिस्टिम बंद असून बॅंकेत सेक्युरिटी देखील नाही.

दि. 05/02/2023 रोजी रविवार असल्यामुळे मंठा बँकेमध्ये शिपाई गंगाधर किसनराव वाघमारे यांनी व्हाऊचर बांधणीचे काम करुन संध्याकाळी 05.00 वाजता बँक बंद केली. त्यानंतर आज दिनांक 06/08/2023 रोजी सकाळी 08.30 वाजता नेहमी प्रमाणे शिपाई गंगाधर किसनराव वाघमारे याने बँक उघडली असता बँकेच्या पाठीमागील लोखंडी गेट उघडे दिसले.

यामुळे वाघमारे यांनी शाखाधिकारी श्रीधर सरकटे यांना फोनद्वारे कळवले. त्यावरुन शाखाधिकारी श्रीधर सरकटे लगेच बँकेत पोहोचले. तेथे पाहिले असता बँकेच्या पाठीमागील लोखंडी गेटचे लॉक तुटलेले दिसले व गेट उघडे दिसले त्यानंतर बँकेत जावून पाहिले दोन रुमच्या दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसले तसेच तिजोरीच्या रुममधील लोखंडी गेटचे व लाकडी दरवाजाचे लॉक तोडुन कोंडा कापलेला दिसला. आतील दोन तिजोरी ठेवलेले शटर वर करून तिजोरीच्या लॉकला छेडछाड करून त्या उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही तिजोरी लोखंडाच्या मजबुत असल्यामुळे त्या उघडल्या नाहीत.

याप्रकरणी शाखाधिकारी श्रीधर सरकटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मंठा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!