वैजापूर
Trending

वैजापूर, शिऊर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद ! नेवासा फाट्यावरून मुसक्या आवळल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- पोलीस ठाणे शिऊर व वैजापूर हद्यीत घरफोडी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. नेवासा फाटा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मोबाईल व रोख रक्कम त्याच्या ताब्यातून पोलिसांनी हस्तगत केली. स्वास्तिक ऊर्फे शिवा तिरुलाल चव्हाण (वय २४ वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव ह. मु-नेवासा फाटा, ता. नेवासा जि. अहमदनगर) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी राजू शौकत शाहा (वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा सफीयाबादवाडी, शिऊर, – ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोस्टे शिऊर येथे दि २१ / ०३ / २०२३ रोजी १९.४६ वाजता तक्रार दिली की, दिनांक २१/०३/२०२३ रोजी ०१.३० वाजे दरम्यान त्यांच्या राहते घराचा किचनचा दरवाजा तोडून पर्समधील रोख रक्कम व आयटेल कंपनीचा मोबाईल असा एकूण १४,५००/- रू किंमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरला. या फिर्यादीवरुन पोस्टे शिऊर येथे गुरनं ६२ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडुन तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा स्वास्तिक ऊर्फे शिवा तिरुलाल चव्हाण (वय २४ वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव ह. मु-नेवासा फाटा, ता. नेवासा जि. अहमदनगर) याने केल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांनी तात्काळ एक टिम नेवासा फाटा येथे रवाना केली.

आरोपी याचा मौजे नेवासा फाटा येथे शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. सदर गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने खालील गुन्हयांची कबुली देवुन पोलीस स्टेशन शिऊर येथील गुन्हयात चोरी केलेल्या मुद्येमालापैकी ५,०००/- रु किंमतीचा मोबाईल काढून दिला. पोलिसांनी तो जप्त केला. तसेच पोलीस ठाणे वैजापूर येथील गुन्हयातील १,१००/- रु नगदी असा एकूण ६,१००/- रू किंमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपीस पुढील तपास कामी पोलीस ठाणे शिऊर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोली अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, पोउपनि विजय जाधव, पोह घुगे, पोह निकम, पो.कॉ राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी ही कामगरिरी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!